Gharo Ghari Matichya Chuli Tv serial  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Tv Serial: कोण आहे हृषिकेश? संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळणार

Gharo Ghari Matichya Chuli: स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Gharo Ghari Matichya Chuli Tv serial

स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ज्या हृषिकेश बद्दल इतकं भरभरुन बोललं जातंय त्या हृषिकेषची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार याची कमालीची उत्सुकता होती.

अखेर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे. हृषिकेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुमीत पुसावळे. सुमीतला याआधी आपण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलोय. मात्र हृषिकेश ही व्यक्तिरेखा त्याने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना सुमीत म्हणाला, ‘स्टार प्रवाह कुटुंबाचा सदस्य होतोय याचा मनापासून आनंद आहे. मी याआधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय. ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय. त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल उत्सुक आहे. या मालिकेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे. खूप चांगले कलावंत मालिकेत आहेत.'' . (Latest Marathi News)

तो म्हणाला, ''एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. मला असं वाटतं एकत्र कुटुंब ही रणदिवे कुटुंबाती खरी ताकद आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की एक लाकडाची काठी तोडणं सोपं आहे. मात्र लाकडाची मोळी तोडणं तितकंच अवघड. त्यामुळे कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT