Yo Yo Honey Singh Saam Tv news
मनोरंजन बातम्या

Yo Yo Honey Singh: घटस्फोटानंतर हनी सिंगने दिली नव्या प्रेमीची कबुली…

हनी सिंगने काही महिन्यांपूर्वी पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर काही दिवसातच हनी सिंगने त्याच्या नवीन प्रेमाचे नाव उघड केले.

Chetan Bodke

Yo Yo Honey Singh: सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंगने बॉलिवूडसह इतर भाषेत चित्रपटात आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. हनी सिंग हिप हॉप म्युझिक लवर्स हा चाहतावर्ग डोळ्यासमोर ठेवत नेहमी आपले गाणे लॉंच करत असतो, हनी सिंगचा चाहते तरुण सर्वाधिक आहेत. त्याच्या प्रत्येक गाण्याला चाहते भरभरुन प्रेम करत असतात.

हनी सिंगने दिल्लीतील एका कार्यक्रमात टीना थडानीला डेट करत असल्याची घोषणा केली आहे. हनी सिंगने काही महिन्यांपूर्वी पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर काही दिवसातच हनी सिंगने त्याच्या नवीन प्रेमाचे नाव उघड केले. आता चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की कोण आहे टीना थडानी.

कोण आहे टीना थडानी?

मिळालेल्या माहितीनुसार, हनी सिंगची गर्लफ्रेंड टीना थडानी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हनी सिंगच्या 'पॅरिस का ट्रिप' या गाण्यात ती दिसली होती. हे गाणे मिलिंद गाबाने गायले होते. टीना सध्या मुंबईत राहत आहे. टीना एक मल्टी टॅलेंटेड सेलिब्रिटींपैकी आहे. मॉडेल आणि अभिनेत्रीसोबतच ती दिग्दर्शक सुद्धा आहे. टीनाने 'द लेफ्टओव्हर्स' या शॉर्ट फिल्मचेही दिग्दर्शन केले होते.

हनी सिंगने दिल्लीतील एका कार्यक्रमात त्याचा नवीन अल्बम हनी 3.0 नुकताच लाँच केला. यावेळी त्याची गर्लफ्रेंड टीना थडानीही तिथे उपस्थित होती. स्टेजवर हातात माइक घेऊन हनी सिंगने त्याची गर्लफ्रेंड टीना थडानी हिची सर्वांना ओळख करून दिली. तो म्हणतो, “ही माझी गर्लफ्रेंड टीना आहे , तिने मला नवीन नाव दिलं आहे. ती म्हणाली की मी ‘हनी ३.०’ आहे.”

याशिवाय हनी सिंगने त्याच्या अल्बमबद्दल सांगितले. त्याने 48 गाणी संगीतबद्ध केली होती, त्यापैकी 10 गाणी या अल्बमसाठी निवडण्यात आली आहेत. टीना थडानी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असून तिचे ६० हजारच्या आसपास युजर्स फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT