Nitin Desai Death Update Is Nitin Desai's ND Studio under confiscation Saam TV
मनोरंजन बातम्या

Nitin Desai Death Update : नितीन देसाईंना कोण त्रास देत होतं, ते ४ जण कोण? अखेरच्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

Nitin Desai News : नितीन देसाईंनी अखेरचा श्वास घेण्यापूर्वी एक व्हाईस क्लीप रेकॉर्ड केल्याची माहितीही समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nitin Desai Death Update :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकल्पित जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक अजरामर कलाकृती अत्यंत संयम आणि जिद्दीने उभारणाऱ्या नितीन देसाई बाळगणाऱ्या देसाई यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं असाव? असा प्रश्नही अनेकांना अस्वस्थ करत आहे. पोलिसांच्या चौकशीत चार जणांची नावं समोर आल्याची माहिती समोर येत आहे.

नितीन देसाईंनी अखेरचा श्वास घेण्यापूर्वी एक व्हाईस क्लीप रेकॉर्ड केल्याची माहितीही समोर येत आहे. याच क्लिपमध्ये त्यांनी चार जणांची नावे रेकॉर्ड केल्याचाही दावा केला जात आहे.

नेमकं काय झालं?

नितीन देसाई हे मंगळवारी रात्री दिल्लीहून मुंबईला आले. मुंबईला आल्यावर ते मध्यारात्री 2:30 वाजेच्या सुमारास आपल्या कर्जतच्या एनडी स्टुडीओत पोहचले. तिथे त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावलं आणि त्याच्याकडून त्यांनी व्हाईस रेकॉर्डर घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर मॅनेजर सकाळी देसाई यांच्याकडे गेला त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. नितीन देसाईंना अशा अवस्थेत पाहणारा त्यांचा मॅनेजर हा पहिला व्यक्ती होता. आता याच व्हॉईस रेकॉर्डरवरुन पोलीस पुढचा तपास करत आहेत. (Latest News Update)

या रेकॉर्डिंगध्ये त्यांना चार व्यक्तींना कसं छळलं, त्यांच्यावर कशाप्रकारे आर्थिक दबाव टाकला, याबाबत त्यांनी उल्लेख केल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे आता हे चार जण चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. पोलीस चौकशीत कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून या त्यांचा नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत.

नितीन देसाईंवर कर्जाचा डोंगर

नितीन देसाईंवर तब्बल 249 कोटींचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या कर्जतच्या एनडी स्टुडिओवरही जप्ती येणार होती. त्यामुळे देसाईंनी कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल का? की त्यांच्यावर कुणी आर्थिक दबाव आणत होतं? याबाबत आता पोलिस कसून चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT