TRP Rating Of Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Serials: TRP मध्ये लोकप्रिय मालिका पडल्या मागे, 'तुझेच मी गीत गात आहे', 'सुखं म्हणजे नक्की काय असतं!' ला प्रेक्षकांची पसंती

TRP Of Rating: TRP मध्ये लोकप्रिय मालिका पडल्या मागे, 'तुझेच मी गीत गात आहे', 'सुखं म्हणजे नक्की काय असतं!' ला प्रेक्षकांची पसंती

Pooja Dange

Which Marathi Serial Audience Like Most:

टीव्ही विश्वासातील मालिकांचे भवितव्य मालिकांच्या टीआरपीवर अवलंबून असते. गेल्या आठवड्यात आलेल्या टीआरपी आकड्यानंतर कलर्स मराठीवरील दोन मालिका दोन दिवसांत बंद झाल्या.

नुकतेच गेल्या आठवड्यातील मालिकांचे टीआरपीचे आकडे समोर आले आहेत. चला पाहूया या आठवड्यात कोणती मालिका कोणत्या स्थानी आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या आठवड्याप्रमाणेच 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये टॉपला आहे. परंतु या मालिकेचं रेटिंग ०.४ ने घसरलं आहे. दुसऱ्या स्थानावर अभिजित खांडकेकरची मालिका 'तुझेच मी गीत गात आहे' आहे. तर 'सुख म्हणजे नक्कीच काय असतं!' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेचं रेटिंग गेले काही आठवडे घसरलं होता.

तेजश्री प्रधानची नुकतीच सुरु झालेली मालिका 'प्रेमाची गोष्ट' मालिका चौथ्या स्थानावर आहे. ही मालिका जेव्हा टेलिकास्ट झाली तेव्हा पहिले दोन आठवडे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होती. स्टार प्रवाहावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाणारी मालिका 'आई कुठे काय करते' ५ व्या स्थानावर घसरली आहे. म्हणजे यावरून लक्षात येते की, मालिकेत सध्या सुरू असलेली कथा प्रेक्षकांच्या पसंतीस येत नाहीय.

'कुण्या राजाची गं तू राणी' - सहाव्या स्थानी, 'ठिपक्यांची रांगोळी' - सातव्या स्थानी, 'अबोली' दहाव्या स्थानी आहे. टीआरपी रेटिंगमध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या मालिकांनी बाजी मारली आहे. टीआरपी रेटिंगच्या यादीत पहिल्या १३ मालिका या स्टार प्रवाहच्या आहेत. १४, १७, १९, २० क्रमांकावर झी मराठीची 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'नवा गाडी नवं राज्य', 'तू चाल पुढं' या मालिका आहेत.

कलर्स मराठीच्या मालिका २२ ते ३५ क्रमांकादरम्यान आहेत. तर सन मराठी आणि सोनी मराठी काही मालिकांचा देखील यात समावेश आहे.

गेल्या आठवड्यात 'ठरलं तर मग' या मालिकेने ऐतिहासिक कामगिरी केली होती. ७.४ इतकं रेटिंग मिळवून ही मालिका टॉपला होती. या मालिकेच्या संपूर्ण टीमने खूप जल्लोषात त्यांचा आनंद साजरा केला. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT