मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. टायगर श्रॉफला टार्गेट करण्यापूर्वी अभिनेता इम्रान हाश्मी याच्यावरही हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती क्राइम ब्रँचकडून मिळाली आहे. याशिवाय, अभिनेता सलमान खान आणि आमिर खान यांच्या घरांची पाहणी आरोपींनी केल्याचा खुलासाही तपासात समोर आला आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफला टार्गेट करण्यापूर्वी इम्रान हाश्मीचे घर शोधण्याची जबाबदारी आरोपींवर सोपवण्यात आली होती. मात्र, आरोपींना इम्रान हाश्मीचे घर शोधता आले नाही. त्यामुळे पुढील हल्ला त्यांना करता आला नाही. म्हणून दुसऱ्या टार्गेटकडे मोर्चा वळवला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, आरोपींनी सलमान खान आणि आमिर खान यांच्या घरांचीही पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे. या पाहणीमागील नेमका उद्देश काय होता आणि या कलाकारांना टार्गेट करण्यासंदर्भात काही ठोस नियोजन करण्यात आले होते का, याचा तपास सुरू आहे.
तपासातील माहितीनुसार, आरोपींनी सोशल मीडियावरील व्हिडिओंच्या माध्यमातून टायगर श्रॉफच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. टायगर श्रॉफ दर रविवारी जुहू येथील पुष्पा नरसी मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी येतो, अशी माहिती आरोपींना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्याला टार्गेट करण्याचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच, अभिनेता संजय दत्त याच्यावरही धोका असल्याचे पोलीसांना समजले आहे.
या प्रकरणात आरोपी प्रांजल आणि बिश्नोई गँगच्या संबंधांचाही तपास सुरू आहे. हरियाणातील विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रांजलला या गँगने मदत केल्याची माहिती क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिली आहे. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रांजल गँगच्या जवळ आल्याचा आणि त्याच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा दावा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.