War 2 VS Coolie SAAM TV
मनोरंजन बातम्या

War 2 VS Coolie : 'कुली'ची तुफान क्रेझ; 'वॉर 2'चा गेम ओव्हर, रजनीकांत यांच्या चित्रपटाने कमावले तब्बल 'इतके' कोटी

War 2 VS Coolie Box Office Collection : 'कुली' आणि 'वॉर 2' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात. दोन्ही चित्रपट एकमेकांना कांटे की टक्कर देत आहेत.

Shreya Maskar

'वॉर 2' आणि 'कुली' दोन्ही चित्रपट 14 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

'वॉर 2' हा हृतिक रोशन तर 'कुली' साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपट आहे.

'कुली'ने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर रजनीकांत आणि हृतिक रोशन यांच्या चित्रपटांमध्ये वॉर पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत. 'वॉर 2' (War 2) आणि 'कुली' (Coolie ) दोन्ही चित्रपट 14 ऑगस्ट थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. एकीकडे 'कुली' बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. तर दुसरीकडे 'वॉर 2'च्या कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. 'सैयारा'नंतर बॉक्स ऑफिसवर 'कुली' ची चर्चा पाहायला मिळत आहेत. चित्रपटांचे सहाव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया.

'कुली' बॉक्स ऑफिस कलेक्शन

रजनीकांत (Rajinikanth ) यांचा 'कुली' चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. 'कुली'मधील आमिर खानचा कॅमिओ पाहायला मिळत आहे. चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत आमिर खान, नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हसन आणि सत्यराज असे अनेक मोठे कलाकार झळकले आहेत.

रजनीकांतचा 'कुली' चित्रपट रिलीज होऊन 6 दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाने सहाव्या दिवशी 9.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, 'कुली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 216 कोटी कमावले आहेत. तर 'कुली'ने जगभरात 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

'वॉर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'वॉर 2' चित्रपटात साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Junior ntr), बॉलिवूडचा स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) झळकली आहे. 'वॉर 2' हा एक ॲक्शन चित्रपट आहे. कियारा अडवाणीचा ग्लॅमरस लूकने चित्रपटाला चारचाँद लावले. चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. 'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर'चा सिक्वेल आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, हृतिक रोशनच्या 'वॉर 2' चित्रपटाने 6 व्या दिवशी मंगळवारी 8.25 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने आतापर्यंत 192.75 कोटी रुपये व्यवसाय केला आहे. 'वॉर 2' च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT