War 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

War 2 : ज्युनियर एनटीआर अन् हृतिकची दमदार ॲक्शन; कियाराच्या ग्लॅमरचा तडका, पाहा जबरदस्त टीझरचा VIDEO

War 2 Teaser Released : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या 'वॉर 2' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Shreya Maskar

आज (20 मे) साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस आहे. आज ज्युनियर एनटीआर 42 वर्षांचा झाला आहे. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. ज्युनियर एनटीआरने आपल्या बर्थडेला चाहत्यांना मोठ गिफ्ट दिलं आहे. त्याचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट 'वॉर 2'चा (War 2 Teaser Released) नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे.

'वॉर 2' चित्रपटात दोन सुपरस्टार आमने सामाने पाहायला मिळणार आहेत. साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Junior ntr) सोबत 'वॉर 2'मध्ये बॉलिवूडचा स्टार अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) झळकणार आहेत. या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज करण्यात आला आहे. 'वॉर 2' हा एक ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर , हृतिक रोशनसोबत बॉलिवूडची अभिनेत्री कियारा अडवाणी ( Kiara Advani ) पाहायला मिळणार आहे.

'वॉर 2' टीझर

'वॉर 2'चा टीझर 1 मिनिट 34 सेकंदाचा आहे. यात ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशनचा ॲक्शन मोड पाहायला मिळत आहे. तसेच टीझरमध्ये कियारा अडवाणीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. 'वॉर 2'चा टीझर 20 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात हृतिक रोशन मेजर कबीर धालीवालच्या भूमिकेत दिसणार आहे.

टीझरच्या सुरुवातीला तुम्ही हृतिक आणि ज्युनियर एनटीआरचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. ज्युनियर एनटीआर हृतिक रोशनला म्हणजे कबीरला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. टीझरमध्ये ज्युनियर एनटीआर आणि हृतिक यांच्यातील कमाल ॲक्शन सीन दाखवण्यात आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटात हृतिक आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

'वॉर 2' रिलीज डेट

ज्युनिअर एनटीआरचा 'वॉर 2' चित्रपट 14 ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर' चा सिक्वेल आहे. चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांना स्वत:ची लघवी पाजायचा अन् काचेच्या कॅबिनमध्ये सर्वांसमोरच...; कॅप्टन खरातचा आणखी एक कारनामा उघड

Maharashtra Live News Update: ठाण्यात इमारतीच्या सातव्या मजल्याला लागली आग

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Pitla Bhakri Recipe: जेवण करायचा कंटाळा आलायं? मग घरी झटपट कमी गॅसमध्ये बनवा झणझणीत पिठलं भाकरी, वाचा रेसिपी

Blood Cancer: भारतात दुर्मिळ कॅन्सरवर मोठे यश, ‘हे’ उपचार ठरले गेमचेंजर

SCROLL FOR NEXT