virat kohli anushka sharma premanand maharaj  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Virat Kohli: कपाळावर टिळा, चेहऱ्यावर आनंद; IPL जिंकल्यानंतर, विराट-अनुष्का पोहोचले प्रेमानंदजी महाराजांच्या भेटीला

Virat Kohli: IPL जिंकल्यानंतर विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावन येथे गेले आहे. तिथे, या कपलने 'राधा केली कुंज आश्रमा'त प्रेमानंदजी महाराजांचे आशीर्वाद घेतले.

Shruti Vilas Kadam

Virat Kohli: IPL 2026 जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) ऐतिहासिक यश मिळवून दिल्यानंतर विराटने आध्यात्मिक शांतीसाठी वृंदावनमध्ये जाऊन प्रसिद्ध संत प्रेमानंदजी महाराजांचे दर्शन घेतले. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात हजेरी लावली. दोघांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी काही वेळ संवादही साधला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे कपल अत्यंत साध्या कपड्यांमध्ये दिसत असून त्यांनी भक्तिभावाने महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी विराजने चॉकलेटी टिशर्ट आणि अनुष्काने पिंक व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही आध्यात्मिकतेकडे विशेष आकर्षित असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यापूर्वीही त्यांनी वृंदावन, हरिद्वार आणि विविध धार्मिक स्थळांना भेट दिली आहेत. विशेष म्हणजे, प्रेमानंद महाराजांप्रती त्यांची श्रद्धा असल्याचे अनेक प्रसंगी समोर आले आहे. महत्त्वाच्या प्रसंगांनंतर किंवा आयुष्यातील मोठ्या टप्प्यानंतर हे कपल त्यांच्या भेटीस जात असतात.

यंदाचा IPL विराट कोहलीसाठी विशेष ठरला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB ला दुसऱ्यांदा विजेतेपद मिळाले. संघाच्या यशात विराटची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याने आध्यात्मिक गुरूंच्या आशीर्वादा घेतला. यावेळी प्रेमानंद महाराजांनीही विराट आणि अनुष्काशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान उपस्थित असलेल्या भक्तांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT