Health Care: वेगवेगळे तेले, वेगवेगळे फायदे! बेंबीत कोणते तेल कधी टाकल्याने शरिराला होतो फायदे ?

Shruti Vilas Kadam

एरंडेल तेल – पचनासाठी उपयुक्त

बेंबीत एरंडेल तेलाचे काही थेंब लावल्याने बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते, असे आयुर्वेदात मानले जाते.

Health Care | Saam Tv

तीळ तेल – सांधे आणि हार्मोनल संतुलनासाठी

तीळ तेल हाडांच्या मजबुतीसाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. काही आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, हार्मोनल संतुलन राखण्यासही याची मदत होऊ शकते.

Health Care

खोबरेल तेल – कोरडी त्वचा आणि फुटलेल्या ओठांसाठी

बेंबीत खोबरेल तेल लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो. कोरडी त्वचा, फुटलेले ओठ आणि त्वचेचा रापलेपणा कमी करण्यासाठी हे तेल वापरले जाते.

Health Care

मोहरीचे तेल – रक्ताभिसरण आणि सांधेदुखीसाठी

मोहरीच्या तेलाची उष्ण प्रकृती शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. सांधेदुखी आणि स्नायूंच्या तक्रारींमध्ये याचा वापर केला जातो.

Health Care | Saam Tv

कडुनिंबाचे तेल – त्वचेच्या समस्यांसाठी

चेहऱ्यावर मुरुम, पुरळ किंवा त्वचेवरील डाग असल्यास कडुनिंबाचे तेल नाभीत लावण्याची पद्धत काहीजण वापरतात. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात.

Health Care | Saam Tv

बदाम तेल – नॅचरल ग्लोसाठी

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक चमकदारपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळांसाठी याचा वापर केला जातो.

Health Care

बेंबीत तेल कसे टाकावे?

रात्री झोपण्यापूर्वी बेंबी स्वच्छ करून ३ ते ४ थेंब तेल टाका आणि हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. मात्र, बेंबीत तेल लावल्याने गंभीर आजार बरे होतात याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही पण हा उपाय पारंपरिक आणि आयुर्वेदिक पद्धतींवर आधारित आहे.

Health Care | Saam Tv

Handvo Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी गुजराती हांडवो, वाचा सोपी रेसिपी

Handvo Chilla Recipe | google
येथे क्लिक करा