Handvo Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी गुजराती हांडवो, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

1 कप तांदूळ, ½ कप चणा डाळ, ¼ कप तूर डाळ, ¼ कप उडीद डाळ, 1 कप किसलेला दुधी भोपळा, 1 टीस्पून आलं-मिरची पेस्ट, ½ कप दही, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून इनो किंवा फ्रूट सॉल्ट

handvo chilla recipe in marathi

डाळ-तांदूळ भिजवा

तांदूळ आणि सर्व डाळी स्वच्छ धुवून 5 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे मिश्रण मऊ होते.

handvo chilla recipe in marathi

पीठ तयार करा

भिजवलेले तांदूळ आणि डाळी थोडे जाडसर वाटून घ्या. त्यात दही घालून मिश्रण 6 ते 8 तास आंबण्यासाठी ठेवा.

handvo chilla recipe in marathi

भाज्या आणि मसाले मिसळा

आंबलेल्या पिठात किसलेला दुधी भोपळा, आलं-मिरची पेस्ट, मीठ आणि हवे असल्यास हळद घालून चांगले मिसळा.

Handvo Chilla Recipe | google

फुलण्यासाठी इनो घाला

हांडवो बनवण्यापूर्वी मिश्रणात इनो घालून हलक्या हाताने एकजीव करा. त्यामुळे हांडवो मऊ आणि स्पंजी होतो.

Pohe Nachni Handvo Recipe

फोडणी देऊन शिजवा

पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, तीळ आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. त्यावर मिश्रण ओतून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा किंवा ओव्हनमध्ये बेक करा.

Pohe Nachni Handvo Recipe

गरमागरम सर्व्ह करा

हांडवो दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचा झाल्यावर तुकडे करून हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

Pohe Nachni Handvo Recipe

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Coconut Ladoo Recipe | yandex
येथे क्लिक करा