Vijay Verma - Tamannaah Bhatia Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Verma - Tamannaah Bhatia : तमन्नासोबतचे रिलेशन पब्लिसिटी स्टंट आहे का? 'सोशल' चर्चांवर स्वतः विजयनं केला मोठा खुलासा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vijay Verma - Tamannaah Bhatia Relationship : विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया हे कपल सध्या दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेत आहे. दोघांमधील रिलेशनशिपच्या चर्चाही चवीचवीनं रंगू लागल्यात. मात्र, त्यांच्यातले प्रेमसंबंध केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, अशी टोकाची टीका नेटकरी करू लागले आहेत. पण आता स्वतः विजय वर्मानं त्यावर मोठा खुलासा केला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनंतर तमन्नाने (Tamannaah Bhatia) बॉलिवूडमध्येही (Bollywood Film) आपलं स्थान भक्कम केलं आहे. अभिनयासोबतच आपल्या लूकनं तिनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली. विजय वर्मासोबत तिची रिलेशनशिप. दोघेही लस्ट स्टोरीज २ (Lust Stories 2) मध्ये एकत्र काम करताहेत. पण त्या चित्रपटापेक्षा त्यांच्या अफेअरची चर्चाच होऊ लागली आहे.

सोशल मीडियावर तर भलतीच चर्चा सुरू आहे. त्या दोघांचे अफेअर केवळ अफवा किंवा पब्लिसिटी स्टंट आहे, असं नेटकरी म्हणू लागलेत. पण ही चर्चा अभिनेता विजय वर्मापर्यंत (Vijay Verma) पोहोचली आणि त्याने दोघांच्या नात्यावर खुलासा करत टीकेला रोखण्याचा प्रयत्न केला.

विजय आणि तमन्नाची ऑनस्क्रीन लव्हस्टोरी प्रेक्षकांना लस्ट स्टोरीज २ (Lust Stories 2) या चित्रपटातून पाहायला मिळाली होती. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तमन्नाने तिच्या आणि विजय वर्माच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली होती. यानंतर हे कपल चांगलंच चर्चेत आले होते. वेबसीरीजच्या (Web Series) प्रमोशनसाठी हा दिखावा होता, असं नेटकरी म्हणत होते. पण आता विजयनेही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत विजयने या सर्व अफवा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तो म्हणाला, 'मी माझ्या या नात्यात खूप खूश आहे. माझं तमन्नावर खूप प्रेम आहे. आयुष्यातील 'खलनायका'चा काळ संपला आहे. तर आता रोमान्सचा काळ सुरू झाला आहे'.

मागील एका मुलाखतीत तमन्नाने तिच्या आणि विजयच्या नात्याचा स्वीकार केला होता. (Vijay Verma - Tamannaah Bhatia relationship) ती म्हणाली, 'नेहमी स्त्रियांनाच नात्यात तडजोडी कराव्या लागतात. पण माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे ज्याने मला आहे तसं स्वीकारलं आहे'.

तमन्नाने विजयला तिच्या आयुष्यातील 'हॅप्पी प्लेस' (आनंदी ठीकाण) असल्याचं म्हटलं होतं. 'विजय आणि मी नेहमीच एकमेकांना प्रोत्साहन देतो. आम्हाला एकमेकांच्या कामाबद्दल खूप आदर आहे. जेव्हा नात्यात दोघेही एकमेकांना समान मान देतात तेव्हा कोणीच आपली मतं एकमेकांवर लादण्याचा प्रयत्न करत नाही', असंही तमन्ना म्हणाली.

तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तमन्ना लवकरच रजनिकांत यांच्यासोबत 'जेलर' (Jailer) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय वर्मा 'लस्ट स्टोरीज २' नंतर आता 'कालकोट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT