Vijay Kenkare New Marathi Drama Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Drama: मराठी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक नवं नाटक; 'आपण यांना पाहिलंत का? लवकरच येणार रंगभूमीवर

Vijay Kenkare Drama: ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं नाटक घेऊन लवकरच रंगभूमीवर येत आहेत.

Pooja Dange

Apan Yanna Pahilat Ka? Marathi Drama:

मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस आले आहेत. रंगभूमीवर मराठी नाटकं आता गाजायला लागली आहेत. प्रेक्षक नाटकांना हाऊस फुल्ल प्रतिसाद देत आहेत. जुने आणि नवीन कलाकार रंगभूमीवर वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच आता दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नवीन नाटकाची यात भर पडणार आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाची शंभरी पार केली आहे. आता 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं नाटक घेऊन ते लवकरच रंगभूमीवर येत आहेत.

'आपण यांना पाहिलंत का?'ची कथा

या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. वैवाहिक आयुष्याची बरीच वर्षे सोबत काढल्यावर नवरा बायको नकळतपणे एकमेकांना गृहीत धरू लागतात. (Celebrity)

नवरा बायको सुखी तर असतात, पण त्यांच्या संसारात पोकळी नेहमी जाणवत राहत. ती पोकळी कोणी एक व्यक्ती भरून काढतं, ती व्यक्ती त्या जोडप्यांच्या संसारात कधी कधी दिसते, तर कधी नाही दिसत, पण त्या व्यक्तीच्या असण्याने जो संसार कंटाळवाणा झाला आहे तो अचनाकपणे ताजातवाना होतो. त्याच्या येण्याने जी काही गंमत संसारात होऊ शकते ती सर्व गंमत 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. त्यातच पती-पत्नी, नातेसंबंध हा विषय प्रत्येक काळात कालसुसंगत असतो. त्यामुळे 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकात आता काय धमाल अनुभवायला मिळणार याची उत्सुकता आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपची जाहीर सभा

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT