Vidya Balan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vidya Balan : विद्या बालनची मराठी इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री; 'या' मालिकेत दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, पाहा VIDEO

Kamali Marathi Serial : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आता मराठी मालिकेत पाहायला मिळणार आहे. याचा खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. आता विद्या बालन एका नवीन भूमिकेत तुमच्या भेटीला येत आहे. विद्या बालन आता मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मात्र यात एक ट्विस्ट आहे. बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन मराठी मालिकेत झळकणार आहे. तसा प्रोमो समोर आला आहे.

झी मराठीवर कालपासून 'कमळी' (Kamali Marathi Serial ) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत विद्या बालनने धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. हा प्रोमो झी मराठीने शेअर केला आहे. या व्हिडीओत विद्या बालन शिक्षिकाच्या भूमिकेत दिसत आहे. कमळीला विद्या बालन व्यवहार ज्ञानाचे धडे देत आहे. या प्रोमोला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कमळीला मिळणार विद्याची साथ,आजपासून सुरू होणार स्वप्नांचा प्रवास!" या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच प्रेक्षक देखील मालिका पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

व्हिडीओमध्ये विद्या आणि कमळीमध्ये संवाद घडताना दिसत आहे. विद्या कमळीसोबत मराठी भाषेत बोलत आहेत. विद्या कमळीला प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यानंतर विद्या बालन आणि कमळी 'छडी लागे छम छम' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या मजेशीर प्रोमोनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'कमळी' ही नवीन मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री 9 वाजता पाहता येणार आहे.

करिअर

विद्या बालनने करिअरच्या सुरुवातीला 'हम पांच' या मालिकेत काम केले आहे. यात तिने अशोक सराफ यांच्यासोबत काम केले. त्यानंतर ती चित्रपटात आली. 'परिणीता' चित्रपटातून विद्या बालनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर तिने अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. यात भूल भुलैया, कहानी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासगी शाळेकडून पोलिस कर्मचाऱ्याची फसवणूक, मुलांची फी परत न मिळाल्याने डोळ्यात अश्रू

Maharashtra Live News Update: मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी

Fennel Water For Weight Loss: बेली फॅट कमी करण्यासाठी बडीशेपचं पाणी प्या अन् आठवडाभरात बारीक व्हा

Akola Crime : अकोला हादरला! भविष्यात संपत्तीत हिस्सा मागणार या भीतीने सावत्र बापानं 9 वर्षीय मुलाला संपवलं

गाव आणि शहरांच्या नावापुढे 'गढ' शब्द का जोडला जातो? जाणून घ्या रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT