Vicky Kaushal In Mahakumbh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal: विकी कौशल महाकुंभ मेळ्यात सहभागी; त्रिवेणी संगमावर केलं पवित्र अमृतस्नान, VIDEO व्हायरल

Vicky Kaushal In Mahakumbh: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल प्रयागराजला पोहोचला. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. यावेळी, छावा चित्रपटाची सह-कलाकार रश्मिका मंदान्ना देखील सोबत होती.

Shruti Vilas Kadam

Vicky kaushal: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल गुरुवारी प्रयागराजला गेला होता तिथे जाऊन त्याने त्रिवेणी संगमात स्नान करण्यास भाग्यवान वाटल्याचे त्याने सांगितले. विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

माध्यमांशी बोलताना विकी कौशल म्हणाला, "मला खूप बरं वाटत आहे. महाकुंभमध्ये येण्याच्या संधीची मी खूप मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. आता मी इथे आलो आहे, त्यामुळे मला खूप छान आणि भाग्यवान वाटत आहे."

तो सह-कलाकार रश्मिका मंदानासोबत धार्मिक स्थळी गेला होता

विकी कौशल त्याच्या 'छावा' चित्रपटातील सह-कलाकार रश्मिका मंदान्नासोबत धार्मिक स्थळांना भेट देत आहे. त्यांनी अलिकडेच अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, शिर्डी साई बाबा मंदिर आणि वेरूळ लेण्यांजवळील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे भेट दिली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे

'छावा' चित्रपटात विकी कौशल मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे आणि निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे.

दररोज कोट्यवधी भाविक स्नान करतात

प्रयागराजच्या संगम शहरात आयोजित महाकुंभमेळ्यात, माघ पौर्णिमेच्या दिवशी देश आणि जगभरातील कोट्यवधी भाविक स्नान करण्यासाठी येत आहेत. या महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारी पर्यत सर्व भाविकांना सहभागी होता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT