Chhaava Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box office Collection : विकी कौशलच्या 'छावा'च्या कमाईची घोडदौड कायम, २०० कोटींचा टप्पा पार करत रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन

Chhaava Box Office Collection Worldwide Day 4: विकी कौशलचा चित्रपट छावा बॉक्स ऑफिसवर येताच लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने भारतातच नाही तर परदेशातही चांगली कमाई केली आहे.

Prashant Patil

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांचा चित्रपट 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. छावा फक्त भारतातच नाही तर जगभरात खूप पसंत केला जात आहे. या चित्रपटाने अवघ्या २ दिवसात जगभरात १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. आता हिंदूस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. विकी कौशलचा 'छावा' आता जगभरात अनेक विक्रम मोडणार आहे. नवीन वर्ष म्हणजे यंदाच्या वर्षात 'छावा' हा पहिला चित्रपट ठरलाय ज्याने २०० कोटींचा टप्पा पार केलाय.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गर्जना करतोय. चित्रपट प्रदर्शित होऊन ६ दिवस झालेत. मात्र आता 'छावा'ने थेट बाहुबली २ या चित्रपटाच्या कमाईशी स्पर्धा सुरु केलीय. मात्र आतापर्यंत कोणत्या चित्रपटांनी २०० कोटींचा टप्पा पार करत रेकॉर्ड रचलाय? पाहूयात.

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'- 3 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार

जवान, ॲनिमल, पठान- 4 दिवसात 200 कोटींची कमाई

गदर 2 आणि स्त्री 2 - 5 दिवसात 200 कोटी

बाहुबली 2 - 6 दिवसात 200 कोटी

अभिनेता विकी कौशलच्या 'छावा'ने पहिल्याच दिवशी ३३ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर वर्किंग डेचा 'छावा'च्या कमाईवर कोणताच परिणाम दिसला नाही. सहाव्या दिवशीही 'छावा'च्या कमाईची घोडदौड कायम आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रपट असल्याने 'छावा' सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात येत असतानाच राज्यात २०१७ पासून करमणूक करच नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

बाहुबली २ चित्रपटाने १४०० कोटींच्या कमाईचं उड्डाण घेतलं होतं. आता त्याच वेगाने 'छावा' चित्रपट गर्जना करत झेप घेतोय. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT