Chhaava Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : विकीच्या 'छावा'ने 'पुष्पा 2'ला टाकले मागे, ६ दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार

Chhaava Box Office Collection Day 6: विकी कौशलच्या 'छावा' ने अवघ्या सहा दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच चित्रपटाने 'पुष्पा 2' सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Shreya Maskar

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava) चित्रपटाने अवघ्या 6 दिवसात बॉक्स ऑफिस गाजवले आहे. चित्रपटाने तब्बल 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांमध्ये 'छावा'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. हा सुपरहिट चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळत आहेत.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

  • 'छावा' पहिला दिवस - 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 197.75 कोटी रुपये

आतापर्यंत कोणत्या चित्रपटांनी २०० कोटींचा टप्पा पार केला?

  • 'पुष्पा 2'- 3 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार

  • जवान, अॅनिमल, पठान- 4 दिवसात 200 कोटींची कमाई

  • गदर 2, स्त्री - 25 दिवसात 200 कोटी

  • 'बाहुबली 2' - 6 दिवसात 200 कोटी

'छावा' 300 कोटींची घोडदौड सुरू

'छावा' चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसात 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता या चित्रपटाची 300 कोटींची घोडदौड सुरू झाली आहे. विकी कौशलचा 'छावा' अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे.

'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' चित्रपटाने चार दिवसांत सिनेमाचे बजेट वसूल केले आहे. चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे. छावा' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटी कमावले होते. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT