Vicky Kaushal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal : कतरिना कैफने दिली गुडन्यूज; विकी कौशलनं लेकासाठी खरेदी केली करोडो रुपयांची लग्जरी कार, पाहा VIDEO

Vicky Kaushal Buys Luxury Car : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने नुकतीच लग्जरी कार खरेदी केली आहे. कारची किंमत कोटींच्या घरात आहे. आलिशान कारची सुंदर झलक पाहा.

Shreya Maskar

विकी कौशलने नुकतीच लग्जरी कार खरेदी केली आहे.

विकी कौशल अलिकडेच बाबा झाला आहे.

विकीची आलिशान कार कोटींच्या घरात आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशलला 2025 वर्ष खूपच खास ठरले. यावर्षी त्याच्या आयुष्यात खूप खास गोष्टी घडल्या. पहिले त्याचा 'छावा' चित्रपट जगभरात सुपरहिट झाला. हा विकी कौशलच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. त्यानंतर अलिकडेच विकी कौशल आणि कतरिना कैफ आई-बाबा झाले. कतरिनाने गोंडस मुलाला जन्म दिला. आता पुन्हा एकदा विकी-कतरिनाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. विकी-कतरिनाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.

विकी कौशलने नुकतीच लग्जरी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. विकी कौशलच्या नवीन कारचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी खरेदी केली आहे. आपल्या लेकासाठी विकीने आलिशान चमकदार कार गाडी खरेदी केली आहे.

कारचे नाव -किंमत

विकी कौशलच्या नवीन लग्जरी कारचे नाव Lexus LM 350h Ultra Luxury असे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही आलिशान कार तब्बल 3.20 कोटी रुपयांची आहे. विकीची नवीन कार हायब्रिड इंजिनच्या साहाय्याने चालते. ब्रेक असिस्ट आणि रडार कॅमेरा सारखी ड्राइव्ह-असिस्ट देखील आहेत. ज्यामुळे ड्रायव्हिंग सुरक्षित होते. तसेच या आलिशान कारमध्ये क्लायमेट कंट्रोल, चार्जिंग, अपस्केल इंटिरिअर आणि वूडन-लेदर फिनिश आहे. विकी आणि कतरिनाची नवीन कार ४-सीटर आहे. कारचे दमदार फीचर्स गाडीची शोभा वाढवते.

विकी कौशल एका कार्यक्रमात आपल्या ब्रँड न्यू कारसोबत स्पॉट झाला. विकी कौशल आणि कतरिना कैफला 7 नोव्हेंबरला मुलगा झाला. विकी आणि कतरिना 2021 मध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या चार वर्षांनी ते पालक झाले. विकी कौशल लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Side Effects: चपातीमुळे वाढतं वजन अन् शुगर वाढते का? अमेरिकन ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला

मोठी बातमी! स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Vidarbha : वेगळ्या विदर्भाची मागणीने राजकारण तापले, नेमकं काय म्हणाले ? पाहा व्हिडिओ

३ हजारांत तरूणीचा सौदा; द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये सेxxx रॅकेटचा अड्डा, 'असा' उघडा पडला आरोपींचा डाव

SCROLL FOR NEXT