Veteran French actress Nathalie Baye passes away  Saam tv
मनोरंजन बातम्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचे गंभीर आजारामुळे राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सिनेविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत असून चाहते श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Actress Death: हॉलिवूड आणि फ्रेंच चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री नथाली बाये यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. ‘डाऊनटन ॲबी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे जागतिक मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नथाली बाये यांचे निधन पॅरिस येथील त्यांच्या निवासस्थानी झाले. त्या काही काळापासून गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाची माहिती समोर येताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली.

नथाली बाये यांनी 1970 च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी फ्रेंच सिनेमात मोठे नाव कमावले आणि नंतर हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि विविधता यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करू शकल्या.

त्यांनी ‘Catch Me If You Can’ सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. या चित्रपटात त्यांनी लिओनार्डो डिकॅप्रिओ यांच्या आईची भूमिका केली होती, यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर ओळख मिळाली.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक पुरस्कारही मिळवले. फ्रान्समधील प्रतिष्ठित ‘César Awards’ त्यांनी चार वेळा जिंकला होता. नथाली बाये या केवळ उत्कृष्ट अभिनेत्री नव्हत्या, तर त्यांनी फ्रेंच आणि आंतरराष्ट्रीय सिनेमाला मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीने एक मोठी आणि अनुभवी कलाकार गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT