Bhalchandra Kulkarni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhalchandra Kulkarni: मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक भूमिका निभावणारे ज्येष्ठ कलाकार भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले.

Chetan Bodke

Bhalchandra Kulkarni Dies: मराठी चित्रपटसृष्टीतून दुख:द बातमी आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक भूमिका निभावणारे ज्येष्ठ कलाकार भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले. भालचंद्र कुलकर्णी यांचे आज अल्पशा आजाराने कोल्हापुरात निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भालचंद्र कुलकर्णी अभिनय क्षेत्रापासून दुर होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रेक्षकांच्या समोर आले होते.

गेल्या चार ते पाच दशकांच्या कारकिर्दीत असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक चित्रपटातून भालचंद्र कुलकर्णी यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. भालचंद्र यांचं मराठी सिनेसृष्टीतील योगदान फार मोलाचं होतं. त्यांनी नेहमीच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या होत्या. आपल्या उत्कृष्ट कामामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे भालचंद्र कुलकर्णी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्याच आले होते.

भालचंद्र कुलकर्णी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सोबतच जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘ब्रँड कोल्हापूर’च्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार त्यांच्या सिनेकारकिर्दीतील अखेरचा पुरस्कार ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT