Veteran bollywood filmmaker Chandra Barot passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Director Passes Away: बॉलिवूडवर शोककळा, अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' चित्रपटाचे डायरेक्टर काळाच्या पडद्याआड

Famous Director Passes Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे वयाच्या ८६व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आयकॉनिक "डॉन" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

Shruti Vilas Kadam

Famous Director Passes Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे वयाच्या ८६व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आयकॉनिक 'डॉन' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डबल रोल साकारला होता आणि हा चित्रपट आजही बॉलिवूडमध्ये क्लासिक म्हणून ओळखला जातो.

चंद्रा बारोट हे गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांचं निधन मंगळवारी १६ जुलै २०२५ रोजी रात्री उशिरा मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी झालं. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

"डॉन" चित्रपटाने बारोट यांना मोठी ओळख दिली. हा चित्रपट केवळ यशस्वीच ठरला नाही, तर त्याचे संवाद, संगीत आणि अभिनय आजही लोकांच्या मनात घर करून आहे. नंतर या चित्रपटावर आधारित रिमेक्सही तयार झाले, मात्र चंद्रा बारोट यांच्या दिग्दर्शनातील मूळ चित्रपटाला "डॉन" आजही खास मानला जातो.

चंद्रा बारोट हे अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर होते, परंतु त्यांचे योगदान आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि असंख्य चाहत्यांचा स्नेह राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT