Terence Donovan passed away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: मनोरंजनविश्वातील आणखी एक तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Actor Death News: ज्येष्ठ अभिनेत्याचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अभिनयप्रवासाचे वर्णन करत त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मिडियावर सांगितली.

Shruti Vilas Kadam

Actor Death News: ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते टेरेन्स डोनोव्हन यांचे वयाच्या ९०व्या वर्षी मेलबर्न येथे शांतपणे निधन झाले. नेबर्स आणि होम एॅणड अवे या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या संस्मरणीय भूमिकांमुळे ते घराघरांत पोहोचले होते. त्यांच्या निधनाची काही दिवसांनंतर माहिती कुटुंबीयांनी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

टेरेन्स डोनोव्हन यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता-गायक जेसन डोनोव्हन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन दिली. वडिलांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी, "ते आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार, माझे सर्वात जवळचे मित्र आणि आयुष्यभर प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते," अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. तसेच उपचारादरम्यान मदत करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

१९३५ मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या टेरेन्स डोनोव्हन यांनी तरुणवयात ऑस्ट्रेलियात स्थलांतर केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी रंगभूमीवर काम करत अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर डिव्हिजन ४, कॉप शॉप, द फ्लाइंग डॉक्टर्स, सन्स अँड डॉटर्स यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. ब्रेकर मोरंट आणि द मॅन फ्रॉम स्नोई रिव्हरया चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी दाद दिली.

मात्र त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती नेबर्स मालिकेतील डग विलिस (Doug Willis) या भूमिकेमुळे. त्यांनी ही भूमिका अनेक वर्षे साकारली. Home and Awayमध्ये त्यांनी अल सिम्पसन ही भूमिकाही साकारली होती. त्यांच्या दमदार अभिनयामुळे ते ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनमधील एक प्रतिष्ठित नाव बनले.

टेरेन्स डोनोव्हन यांचा अभिनयाचा वारसा पुढील पिढीतही कायम आहे. त्यांचा मुलगा जेसन डोनोव्हन हा लोकप्रिय अभिनेता आणि गायक असून, नात जेम्मा डोनोव्हन हिनेही नेबर्स मालिकेत काम केले आहे. त्यामुळे डोनोव्हन कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? मुख्यमंत्र्यांनी २ शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर शोकसभा

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना विचारा हे 5 प्रश्न

NHAI Toll Rules: खुशखबर! टोल टॅक्समध्ये 40% पर्यंत मोठी सूट! NHAI चा नवा नियम लागू

GEN - G आंदोलनात बहरलं प्रेम; बिहारच्या तरुणाने दिल्लीतील विद्यार्थिनीशी बांधली लग्नगाठ

SCROLL FOR NEXT