Nana Patekar Death After Goa Viral Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar : तबला वाजवला, सर्वांसोबत नाचले सुद्धा... नाना पाटेकर यांचा शेवटचा Video व्हायरल

Nana Patekar Goa Viral Video News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांचा गोवा पर्यटन दिन कार्यक्रमातील शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Alisha Khedekar

नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजनविश्वासह चाहत्यांना मोठा धक्का

निधनापूर्वीचा गोव्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

व्हिडिओमध्ये नाना पाटेकर कलाकारांसोबत नृत्य आणि तबला वादनाचा आनंद घेताना दिसत आहेत

Nana Patekar Death Today Update News ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजनविश्वासह संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुःखद बातमीनंतर नाना पाटेकर यांचा निधनापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर अगदी उत्साहात आणि आनंदी वातावरणात तरुणाईसोबत वाद्य वाजवताना दिसत आहेत.

पीटीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नाना पाटेकर यांनी गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा पर्यटन दिन’ कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थित कलाकारांसोबत संवाद साधला. एवढंच नाही तर कलाकारांच्या सादरीकरणाचा आनंद घेत त्यांनी त्यांना उत्स्फूर्त दादही दिली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर काही कलाकारांसोबत नृत्य करताना दिसत आहेत. त्याचबरोबर ते तबलाही वाजवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद पाहून काही क्षणांपूर्वीच ते आपल्यात होते, याची जाणीव हा व्हिडिओ पाहणाऱ्या चाहत्यांना होत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी भाषणही केले होते. कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांनी रंगभूमीशी असलेले आपले नाते व्यक्त केले. आपल्याला पुढेही रंगभूमीवर काम करत राहायचे असून केवळ नाटकं करत राहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त करत आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते भावूक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar : 'आवाज', 'डायलॉग डिलिव्हरी' अन् तोच धाक; नाना पाटेकरांचे ७ गाजलेले चित्रपट

Maharashtra News Live Update : अनधिकृत स्टॉलवर सावंतवाडी नगरपालिकेची धडक कारवाई

Nana Patekar : 'आ गए मेरी मौत का तमाशा देखने...'; नानांचे 'हे' १० डायलॉग तुम्ही कधीच विसरणार नाहीत

Salt water: सकाळी उठल्यावर प्या एक ग्लास मीठाचं पाणी; मिळतील 4 जबरदस्त फायदे

Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सराफा बाजारात १ तोळे सोन्याची किंमत इतकी; वाचा 24k, 22k, 18k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT