Veer pahariya Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Veer Pahariya: मी ट्रोलिंगला नेहमीच हलक्यात.. सोलापूरात प्रणित मोरेवर हल्ला, वीर पहारियानं दिली पहिली प्रतिक्रिया

Veer Pahariya on Pranit More Instagram statement Viral: सोलापुरात विनोदवीर प्रणित मोरे याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अभिनेता वीर पहारिया यानं इंस्टाग्रामवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Bhagyashree Kamble

अभिनेता वीर पहारिया स्काय फोर्स या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वीर पहारियानं स्काय फोर्समध्ये साकारलेली भूमिका चाहत्यांना प्रचंड भावली. सध्या वीर पहारिया एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे आणि चर्चेचं कारण म्हणजे कॉमेडीयन प्रणित मोरे. सोलापूरमधील एका कॉमेडी शो दरम्यान, वीर पहारिया याच्याबद्दल प्रणित मोरे याने विनोद केला होता. या विनोदावरून प्रणित मोरेवर वीर पहारियाच्या चाहत्यांनी हल्ला चढवला. यानंतर मोरेच्या चाहत्यांनी संपूर्ण घटना इंस्टाग्रामवर शेअर केली. यावर वीर पहारिया यानं देखील इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

वीर पहारियाची प्रतिक्रिया

या घटनेनंतर अभिनेता वीर पहारिया यानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं आहे. ज्यात त्यानं हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच झालेल्या हल्ल्याबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्यांना शिक्षा झाली पाहीजे आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यानं सांगितलं.

'मी अत्यंत दु:खी आहे. घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. मी कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. ही घटना माझ्या विचारसरणीच्या विरूद्ध आहे आणि मी या प्रकरणाच्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. हा हल्ला ज्यांनी केला त्याला शिक्षा व्हावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल', असं पहारिया यानं इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याची माहिती दिली आहे.

'मी ट्रोलिंगला नेहमीच हलक्यात घेतो आणि त्यावर हस्तोही. मी सहकारी कलाकाराला, इजा करण्याचा विचारही करू शकत नाही'. या घटनेनंतर वीर पहारिया यांनी त्यांच्या चाहत्यांची आणि प्रणित मोरे यांची माफी मागितली. या घटनेनंतर वीर पहारिया आणि प्रणित मोरेवर झालेल्या हल्ल्याची चर्चा चाहते आणि नेटकऱ्यांमध्ये होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

Jalebi Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी जलेबी, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: कार्यालयात शिरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न, CCTV Video व्हायरल

SCROLL FOR NEXT