Anurag kashyap Google
मनोरंजन बातम्या

Anurag Kashyap : अनुराग कश्यपशी भांडणानंतर चित्रपट सोडणारा सहाय्यक दिग्दर्शक आज आहे प्रसिद्ध निर्माता; वाचा सविस्तर

Anurag Kashyap : अनुराग कश्यप या चित्रपटाच्या सेटवर सहाय्यक दिग्दर्शकाचे अनुराग कश्यपशी भांडण झाले. त्यानंतर मिळाली मोठी संधी ज्यामुळे आज बॉलिवुड मधील मोठ्या निर्मात्यांंमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anurag Kashyap : अनुराग कश्यपचा 'गँग्स ऑफ वासेपूर' हा बॉलीवूडचा क्लासिक कल्ट चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी आज प्रेक्षकांच्या हृदयात या चित्रपटाचे विशेष स्थान आहे. या चित्रपटाच्या सेटवरील अनेक कथा प्रसिद्ध आहेत. नुकतेच या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक वासन बाला यांनी सांगितले की, अनुराग कश्यपसोबत भांडण झाल्यानंतर त्याने चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडले होते.

एका मुलाखतीत बोलताना वासन बालाने अनुराग कश्यपसोबतच्या त्याच्या भांडणाबद्दल सांगितले, त्याचे म्हणणे आहे की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत त्याचे भांडण झाले होते. तो म्हणतो, '50 दिवसांच्या शूटिंगनंतर अनुराग सर आणि माझे भांडण झाले. आम्ही अभिनेता पियुष मिश्रासोबत प्रवास करत असताना ही भांडणे झाले. अखेरीस, आमच्या जोरदार वादामुळे पीयूष भाई इतके नाराज झाले की त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला मध्येच गाडीतून बाहेर काढले.

भांडण होऊनही नाते तुटले नाही

'मोनिका ओ माय डार्लिंग'चे दिग्दर्शक वासन बाला सांगतात की, या भांडणानंतरही त्याच्या आणि अनुराग कश्यपच्या नात्यात दुरावा आलेला नाही. तो पुढे म्हणतो की, अनुराग कश्यपने त्याच्या कारकिर्दीत त्याला खूप साथ दिली आहे. दिग्दर्शक वासन बाला यांच्या म्हणण्यानुसार, 'गँग्स ऑफ वासेपूर'चे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे मन मोठे आहे.

अनुराग कश्यपमुळे मोठा ब्रेक मिळाला

'गँग्स ऑफ वासेपूर' सोडल्यानंतर वासन बालाच्या कारकिर्दीला रंजक वळण मिळाले. अनुराग कश्यपने बालाचे नाव ब्रिटीश चित्रपट निर्माते मायकेल विंटरबॉटम यांना सुचवले होते, जो त्याच्या 2011 मध्ये आलेल्या 'तृष्णा' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाच्या शोधात होता. तो सांगतो की मायकलने अनुरागला ईमेल पाठवला होता आणि त्यानंतर दिग्दर्शकाने त्याला काम करायचे आहे का असे विचारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT