Kirtan Programme Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kirtan Programme : वसा संस्कृतीचा-वारसा किर्तनाचा; संतांचे विचार पोहचवणार घरात-घरात

Kirtan Programme : कोणत्याही जाती धर्माची बंधनं न पाळता केवळ भगवत भक्ती हा ज्याचा पाया आहे, अशा वारकरी संप्रदायाची, कीर्तनाची परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचवणारा कार्यक्रम म्हणजे वसा संस्कृतीचा-वारसा किर्तनाचा.

Bharat Jadhav

Kirtan Programme :

‘सन मराठी’ वाहिनी नवीन वर्षाची सुरुवात अतिशय पारंपारिक विचारांनी करत आहे. आपल्या संस्कृतीचा वसा आणि कीर्तनाचा वारसा जपण्यासाठी पुढील पिढीकडे पोहचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. कीर्तनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत संतांचे विचार पोहचवणार आहे. या कार्यक्रमाचे नाव आहे “वसा संस्कृतीचा - वारसा किर्तनाचा”.किर्तनाचा हा कार्यक्रम ९ जानेवारी २०२४ पासून दररोज सकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.(Latest News)

“वसा संस्कृतीचा - वारसा किर्तनाचा” या क्रार्यक्रमासाठी ‘ह.भ.प. भगवतीताई सातारकर’, ‘ह.भ.प. चिन्मयदादा सातारकर’, ‘ह.भ.प.कांचनताई जगताप’, ‘ह.भ.प. शिवलीलाताई पाटील’, ‘ह.भ.प. सोहम महाराज काकडे’ यांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे. आपले किर्तनकार म्हणजे संतांचे फॅन फॉलॉवर्सच. अगदी ज्ञानोबा तुकाराम माऊलींपासून नीलोबांपर्यंत संतांनी केलेले अभंग समजून घेऊन, स्वतः आचरणात आणून ते महान विचार आणि त्यामागील अर्थ लोकांनां समजावणे म्हणजे किर्तन.

किर्तनातून समाज सुधारण्याचे मोलाचे काम घडते. काही किर्तनकार मूळ अभंगात सध्याच्या काळानुसार थोडे फार बदल घडवून सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यामागील विचार लोकांना सांगतात. ऐकणारा श्रोता ऐकता ऐकता गुंग होईल आणि संतांचे महान विचार हे आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणतील याची खात्री किर्तनकार घेत असतात.किर्तन आता पुढच्या पिढीपर्यंत यशस्वीपणे पोहचणार, याची खात्री ‘सन मराठी’ वाहिनी घेईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

SCROLL FOR NEXT