Varun Dhawan -Natasha Dalal PTI
मनोरंजन बातम्या

Varun-Natasha: धवन-दलाल कुटुंबाला मिळाली आनंदाची बातमी; वरुण -नताशाच्या घरी आली 'परी'

Varun Dhawan -Natasha Dalal: वरुण धवनची पत्नी नताशा दलालने लग्नाच्या तीन वर्षानंतर पहिल्या बाळा जन्म दिलाय. आज सकाळी नताशा दलालला प्रसुती कळा सुरू झाल्या होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन बाप झाल्याची वृत्त समोर आले आहे. वरुणची पत्नी नताशा दलालने 3 जून 2024 रोजी एका मुलीला जन्म दिला. मुलाच्या आगमनाने धवन आणि दलाल कुटुंब खूप आनंदी आहे. मुलाच्या स्वागताची तयारी करत आहेत. दरम्यान ही आनंदाची बातमी समजताच वरुण आणि नताशाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आणि आत गर्दी केली. त्यांचे मित्र आणि चाहते वरुण आणि नताशाला अभिनंदन करत आहेत.

३ जून रोजी सकाळी नताशा दलालला प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आनंदाची बातमी आली. वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांच्या चाहत्यांकडून आणि मित्रांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साधरण चार महिन्यांपूर्वी वरुणने सोशल मीडियावर स्वतःचा आणि नताशाचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोतून त्याने आम्ही आई-वडील होणार असल्याची बातमी दिली होती. त्या फोटोमध्ये नताशाचा बेबी बंप दिसत होता आणि वरुण बेबी बंपला किस करताना दिसत होता.

वरुणने 24 जानेवारी 2021 रोजी नताशासोबत अलिबागमध्ये लग्न केले होते. वरुण आणि नताशा शालेय जीवनापासून एकत्र आहेत. आधी दोघांची मैत्री झाली आणि नंतर वरुणने तिला इम्प्रेस करून आपली मैत्रीण बनवले. नताशाने वरुणला चार वेळा प्रेमाचा नकार दिला होता. मात्र ती हो म्हणेपर्यंत वरुणने हार मानली नव्हती.

दरम्यान वरुण सध्या राज आणि डीकेचा चित्रपट 'सिटाडेल: हनी बनी' आणि ॲटलीच्या 'बेबी जॉन'साठी शूटिंग करत आहे. 'सिटाडेल: हनी बनी' मध्ये वरुण सामंथासोबत दिसणार आहे. तर 'बेबी जॉन'मध्ये कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी अभिनेत्री असून त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहऱ्यावरील सूज आणि ओपन पोर्स कमी करायचे आहेत? मग करा ही १ मिनिटाचा सोपा घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी

Shocking : भयंकर! २२ वर्षीय तरुणाने ८ वर्षाच्या मुलीला फसवून जंगलात नेलं बलात्कार केला अन्...

Pune : खाकी डागाळली! PSI चे तरूणीवर लैंगिक अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल

Oral Medicines: सरकारचा नवा नियम; आता मेडिकलमधून कोणालाही मिळणार नाहीत ही औषधं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT