sikandar Movie anjani dhawan Google
मनोरंजन बातम्या

Sikandar: सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात दिसणार 'या' बॉलिवूड अभिनेत्याची भाची; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

Sikandar Movie: सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण धवनची भाची अंजिनी धवन देखील दिसणार आहे.

Shruti Kadam

Sikandar: सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटात वरुण धवनची भाची अंजिनी धवनही दिसणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, आता अंजिनीने स्वतः याची पुष्टी केली आहे की ती या चित्रपटाचा भाग आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना अंजिनी म्हणाली, "चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे आता मी त्याबद्दल बोलू शकते." तिने असेही म्हटले की तिच्या व्यावसायिक आयुष्यात सर्व काही ठीक चालले आहे आणि ती चित्रपटाच्या सेटवर आनंद घेत आहे. तिने शूटिंग सेटला आनंदाचे ठिकाण म्हटले, म्हणजेच या ठिकाणी येऊन तिला खूप आनंद होतो.

अंजिनी पुढे म्हणाली, “मी खूप आभारी आहे. मी जेव्हा जेव्हा चित्रपटाच्या सेटवर जाते, तेव्हा मी स्वतःला चिमटा काढून पाहते की हे स्वप्न आहे की नाही. माझ्यासाठी प्रत्येक दिवस असाच असतो.” सलमान खानसोबत काम करण्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी त्याची खूप मोठी चाहती आहे आणि त्यांना पाहतच मोठी झाले आहे. मला त्यांचे चित्रपट आवडतात. विशेषतः, 'पार्टनर' पासून 'मुझसे शादी करोगी' पर्यंत, ते चित्रपट जे त्यांनी आणि डेव्हिड सरांनी एकत्र केले आहेत."

अंजिनीने असेही म्हटले की जेव्हा तिला बरे वाटत नाही तेव्हा ती 'पार्टनर' पाहते आणि नंतर तिला बरे वाटते. ती शेवटी म्हणाली, “सलमान खान सोबत काम करणे म्हणजे स्वप्न जगण्यासारखे आहे.

अंजिनी धवनचा पहिला चित्रपट

सप्टेंबर २०२४ मध्ये, 'बिनी अँड फॅमिली' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याचे दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले होते. या चित्रपटाद्वारे अंजिनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात पंकज कपूर, राजेश कुमार सारखे स्टार्सही होते. 'सिकंदर' हा तिच्या कारकिर्दीतील दुसरा चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटात तिची भूमिका काय असेल. याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT