Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Varsha Usgaonkar: स्वप्नसुंदरीचा प्रवास संपला! वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घराबाहेर, आता ट्रॉफी कोण जिंकणार?

Bigg Boss Marathi Season 5: कमी मत मिळाल्याने वर्षा उसगावकर यांना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 अंतिम टप्प्यात आहे. या पर्वाचं नुकतंच शेवटचं एव्हिक्शन पार पडलं. बिग बॉसच्या घरातील सात स्पर्धक उरले होते. यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्या आहेत. कमी मत मिळाल्याने वर्षा उसगावकर यांना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

बिग बॉसच्या घरात शेवटच्या एव्हिक्शनमध्ये कोणता स्पर्धक बाहेर पडणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान एव्हिक्शनमध्ये जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर यांना कमी मत मिळाले. यातही वर्षा उसगावकर यांनी कमी मत मिळाले आहेत.यामुळे आता बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक राहिले आहेत. हे सर्व स्पर्धक आता थेट अंतिम फेरीत गेले आहेत.

बिग बॉसच्या घरात एव्हिक्शनमध्ये सर्वात जास्त मत सुरज चव्हाणला मिळाली आहे. यानंतर कोकण कन्या अंकिता वालावलकरचा क्रमांक आहे. बिग बॉसच्या घरातील सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सांवत, धनजंय पोवार, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक अंतिम फेरीमध्ये गेले आहेत. 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले आहे. यामध्ये आता कोण बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी जिंकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT