Raid 2 Trailer instagram
मनोरंजन बातम्या

Raid 2: इलियानाऐवजी वाणी कपूर करणार लीड रोल? अजय देवगण स्पष्टच बोलला...

Raid 2 Movie Cast: रेड २ मध्ये इलियाना डिक्रूझऐवजी वाणी कपूरला कास्ट करण्यात आले आहे. हा बदल का करण्यात आला या प्रश्नाचे उत्तर स्वतः अजय देवगणने दिले आहे.

Shruti Kadam

Raid 2: अजय देवगण पुन्हा एकदा 'अमय पटनायक' या भूमिकेत परतत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमधील उत्साह खूपच वाढला आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की यावेळी आयकर अधिकाऱ्याच्या भूमिकेत अजय बाहुबली नेता म्हणजेच रितेश देशमुखच्या घरावर छापा टाकणार आहे.

अजय देवगणच्या 'रेड २' चा ट्रेलर ८ एप्रिल रोजी रिलीज झाला, यामध्ये अनेक नवीन पात्रांची झलक पाहायला मिळाली. यावेळी वाणी कपूर देखील चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मंगळवारी मुंबईत ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे अजय देवगण आणि वाणी कपूर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'रेड'च्या पहिल्या भागात इलियानाने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती, पण यावेळी ही भूमिका वाणी कपूर साकारत आहे. जेव्हा एका पत्रकाराने वाणीला इलियानाची जागा घेण्याबद्दल विचारले तेव्हा अजय देवगणने अतिशय साधेपणाने उत्तर दिले. अजय म्हणाला, "हो, हे खरे आहे की पात्राची कास्टिंग बदलली आहे, पण ते पात्र स्वतःही बदलू शकते. जर तुम्ही हॉलिवूड चित्रपटांकडे पाहिले तर तिथेही असेच घडते. जसे शॉन कॉनरी आता जेम्स बाँड राहिलेला नाही. पण तरीही प्रेक्षक आवडीने त्याचे चित्रपट पाहतात.

रेड २ चा दमदार ट्रेलर

'रेड २' चा ट्रेलरची सुरुवात अजय देवगण एका आलिशान हवेलीचा दरवाजा ठोठावतो अशी होते. ही हवेली दुसऱ्या कोणाचीही नाही तर रितेश देशमुखच्या पात्राची आहे. अजय आत येऊ देण्याची विनंती करतो तेव्हा रितेशची आई आश्चर्याने विचारते, "तो कोण आहे?" यावर रितेश उत्तर देतो, “लक्षात ठेवा, सात वर्षांपूर्वी तौजीच्या (सौरभ शुक्ला) घरावर छापा टाकणारा अधिकारी... तो तोच माणूस आहे!”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Plastic surgery : कॅन्सरमुळे तरुणानं लिंग गमावलं, ८ वर्षांनी प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना, साडे ९ तास चाललं ऑपरेशन

SCROLL FOR NEXT