Network
मनोरंजन बातम्या

चंद्र प्रकाश बनला KBC 16 चा पहिला करोडपती; पण 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देता येईना? काय होता प्रश्न, काय आहे उत्तर?

जम्मू-काश्मीरचे रहिवासी असलेले चंद्र प्रकाश कौन बनेगा करोडपती सीझन 16 चे पहिले करोडपती बनलाय. तो 7 कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नासाठीही खेळला होता, परंतु त्याला योग्य उत्तर माहिती नव्हते. त्यामुळे त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला. पण वाचकांनो,अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या 7 कोटींच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे माहित आहे का?

Bharat Jadhav

अमिताभ बच्चन हे निवेदक असलेल्या कौन बनेगा करोडपती हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात आवडता आणि सर्वात जास्तवेळा पाहिला जाणारा रिॲलिटी गेम शो आहे. या शोचा 16 वे सत्र सुरू आहे. 12 ऑगस्टपासून सुरू झालेल्या यंदाच्या पहिल्या करोडपतीने 32 व्या भागात प्रवेश केलाय. काश्मीरचा राहणारा 22 वर्षीय चंद्र प्रकाश या सीझनचा पहिला करोडपती बनलाय. चंद्र प्रकाश 7 कोटींच्या जॅकपॉट प्रश्नासाठी खेळ खेळत होता. पण प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकला नाही.

7 कोटींच्या प्रश्नाचे खरे उत्तर काय होते माहित आहे का? असं म्हणतात की, मनात ध्यास असेल तर यशाचा मार्ग सुकर होत असतो. 22 वर्षीय चंद्र प्रकाश देखील अनेक स्वप्ने घेऊन 'कौन बनेगा करोडपती सीझन 16' मध्ये पोहोचला. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देणाऱ्या चंद्रप्रकाश यांनी हे सिद्ध करून दाखवले की ज्ञान ही एकमेव गोष्ट आहे जी हरवता येत नाही.

7 कोटींचा तो प्रश्न काय होता?

करोडपती झाल्यानंतर चंद्र प्रकाशला 7 कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाचा सामना करावा लागला. बिग बींनी त्यांना 7 कोटी रुपयांचा 16 वा प्रश्न विचारला.

1587 मध्ये उत्तर अमेरिकेत इंग्रजी पालकांना जन्मलेले पहिले रेकॉर्ड केलेले मूल कोण होते?

पर्याय होते-

A: व्हर्जिनिया डेअर

ब: व्हर्जिनिया हॉल

सी: व्हर्जिनिया कॉफी

डी: व्हर्जिनिया सिंक

प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे

या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे व्हर्जिनिया डेअर हा पर्याय आहे. मात्र चंद्रप्रकाश या प्रश्नात अडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT