Urvashi Rautela and Rishabh Pant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rishabh Pant: ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, नेटकऱ्यांनी केले जबरदस्त ट्रोल...

उर्वशी रौतेलाही काही पोस्ट करते की नाही, याची सर्वांनाच प्रतीक्षा होती.

Chetan Bodke

Rishabh Pant: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दिल्लीहून उत्तराखंडच्या दिशेने निघालेल्या ऋषभ पंतची कार रुरकी येथे उलटली. अपघात इतका भीषण होता, की ऋषभची कार तीन ते चारवेळा उलटली. त्यानंतर कारने पेट घेत भीषण रुप धारण केले.

अपघातानंतर ऋषभ पंत कसा तरी कारमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याला दिल्लीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तेथून पुढील उपचारासाठी पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

सोशल मीडियावर चाहते आणि अनेक सेलिब्रिटी ऋषभ पंतच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत, अशा परिस्थितीत उर्वशी रौतेलाही काही पोस्ट करते की नाही, याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. उर्वशी रौतेलाने थेट नाही पण तिच्या एका पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शनवरून असे स्पष्ट होते की, ती ऋषभ पंतच्या तब्येतीसाठीच प्रार्थना करत आहे.

उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा लूक तमिळ बिग बॉस फिनालेचा असून ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती.

या लूकमध्ये उर्वशी खुपच सुंदर दिसत आहे. हा फोटो उर्वशीने सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शन दिले की, "प्रार्थना करत आहे." हा फोटो पाहून चाहत्यांच्या मते उर्वशी रौतेलाने ही पोस्ट ऋषभ पंतसाठीच केली आहे.

उर्वशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषभच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करताना दिसत आहे, पण तिचा हा ग्लॅमरस फोटो पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. नेटकरी म्हणतात, ऋषभ पंतला अपघात झाला आहे आणि तू इंस्टाग्रामवर असे फोटो शेअर केले आहेत. ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला आधी रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांचा आता ब्रेकअप झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

पालघरमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट, शाळा गाठण्यासाठी मृत्यूच्या ट्रॅकवरुन प्रवास

Face Care: फेस हेअरसाठी तुम्हीपण रेजर वापरताय? चेहऱ्यावर रेजर वापरण्यापूर्वी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT