Urmila Matondkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Urmila Matondkar : अर्ध्यावरती डाव मोडला! उर्मिला मातोंडकरने 8 वर्षांच्या सुखी संसाराला दिला ब्रेक, मोहसिन अख्तरसोबत घेतला घटस्फोट

Urmila Matondkar Divorce : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. याबाबतची एक नवीन अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या 8 वर्षानंतर उर्मिला पती मोहसिन अख्तर मीरपासून घटस्फोट घेत असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, उर्मिलाने खूप विचारपूर्वक घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir) सोबत घटस्फोटाची याचिका मुंबई न्यायालयात दाखल केली आहे. मात्र त्या दोघांनी याची अद्याप अधिकृत घोषणा केली नाही आहे. यांच्या घटस्फोटाचे नेमकं कारण अद्याप समजलेले नाही आहे. मात्र दोघांच्या परस्पर संमतीने हा घटस्फोट होत नसल्याचे बोले जात आहे. तसेच तिला पती मोहसिनपासून विभक्त होऊन पुन्हा एकदा आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करायचे आहे.

उर्मिला आणि मोहसिन अख्तर बऱ्याच काळापासून एकत्र नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. उर्मिला आणि मोहसिन अख्तर 2016 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. डिझायनर मनीष मल्होत्रा या दोघांचा कॉमन फ्रेंड आहे. यांच्यामुळेच त्या दोघांमध्ये मैत्री झाली. मोहसिन आणि उर्मिला यांची पहिली भेट मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात झाली होती.

मोहसिन अख्तर मीर हा काश्मीरमधील बिझनेसमॅन आणि मॉडेल आहे. उर्मिला आणि मोहसिन यांमध्ये 10 वर्षांच्या फरक आहे. मोहसिन उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. उर्मिलाने 'झाकोळ' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र 'मासूम' चित्रपटामुळे उर्मिला प्रसिद्धीच्या झोकात आली. त्यानंतर उर्मिलाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT