Urfi Javed Instagram
मनोरंजन बातम्या

Urfi Javed In Trouble: उर्फीचं टेन्शन वाढलं! भलत्याच कारणामुळे अडचणीत

उर्फी नव्या अडचणीत, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Shivani Tichkule

Urfi javed Latest News : इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. प्रत्येक वेळी अभिनेत्री तिच्या कपड्यांवर असे काही प्रयोग करून चर्चेत येते, जे पाहून सगळेच थक्क होतात. उर्फी जावेदचा ड्रेसिंग सेन्स पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली असतानाच अनेकजण तिला यासाठी ट्रोल करतानाही दिसत आहेत. आता या स्टाइलमुळे उर्फी नव्या अडचणीत सापडली आहे.

उर्फी जावेदला (Uorfi Javed) मुंबईत भाड्याने घर मिळण्यात अडचणी येत आहेत. याचा खुलासा खुद्द उर्फीने केला आहे. तिने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. मुंबईत (Mumbai) भाड्याने घर मिळण्यात अडचण येत आहे, कोणीही तिला घर द्यायला तयार नाही.  मुंबईत घर शोधण्यासाठी तिला किती संघर्ष करावा लागला याबद्दल तिने ट्विट करून सांगितले आहे. 

उर्फीने ट्विटमध्ये काय लिहिले?

या ट्विटमध्ये उर्फी जावेदने लिहिले की, मी ज्या प्रकारचे कपडे घालते त्यामुळे मुस्लिम जमीनदार मला घर भाड्याने देऊ इच्छित नाहीत, हिंदू मालक मला भाड्याने देऊ इच्छित नाहीत कारण मी मुस्लिम आहे. मला धमक्या येतात कारण काही जमीनदारांच्या समस्या आहेत. मुंबईत भाड्याने घर मिळणे किती अवघड आहे.

या ट्विटनंतर उर्फी जावेद पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या चर्चेत आली आहे. या ट्विटवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हे ट्विट वाचल्यानंतर एकीकडे काही लोक उर्फीला पाठिंबा देताना दिसत आहेत, तर दुसरीकडे काहींनी तिला ट्रोल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT