Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: 'मेरी DP इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू'; उर्फी पुन्हा एकदा बरळली...

सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवल्याच्या आरोपाखाली उर्फीविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Chetan Bodke

Urfi Javed: टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद सध्या बऱ्याच मुद्द्यांवरुन चर्चेत आली आहे. त्यातल्या त्यात तिच्या कपड्यांवरुन तिला बऱ्याच जणांनी सुनावले आहे. तिचे सर्वाधिक चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे, तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवल्याच्या आरोपाखाली उर्फीविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मात्र तिच्यावर आतापर्यंत पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकात जाऊन उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती.

यावरुन गेल्या काही दिवसांपुर्वी दोघींमध्ये बरेच वादही झाले होते. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर निशाणा साधला होता, याला ही उर्फीने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता उर्फी जावेदने पु्न्हा एकदा चित्रा वाघ यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.

आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन चित्रा वाघ यांना डिवचत एक ट्वीट केले आहे. उर्फी ट्वीटमध्ये म्हणते, "मेरी DP इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू" असं म्हटलं आहे.

उर्फी आपल्या कपड्यांवरुन यापुर्वी ट्रोल होत होती, पण आता ती वादग्रस्त विधानांमुळेही ट्रोल होऊ लागली आहे. ती सर्वाधिक ट्रोलिंग होत असल्याने तिची सोशल मीडियावर कमालीची चर्चा होत आहे. ऐकेल ती उर्फी कसली, यापुर्वी ही उर्फीने चित्रा वाघ यांना "आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss" असे म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून डिवचलं होतं.

तसेच यापुर्वीही उर्फीने "जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे." असं म्हणत चित्रा वाघ यांना चॅलेंज दिले होते.

उर्फीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून नेटकरी तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणतो, हे तर लव्ह जिहाद झालं. दुसरा नेटकरी म्हणतो, अजून आपली खिल्ली उडवण्याचं बाकी आहे.

आणखी एक नेटकरी म्हणतो, उर्फी इतनी ढासू, चित्रा वाघके निकले आसूँ. तर आणखी एक नेटकरी म्हणतोय, सासू बाई कोमात, सून बाई जोमात अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीच्या पोस्टवर आपले मत मांडले आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी, नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने तिच्या पायांचा एक फोटो टाकला होता, त्याच्यावर तिला पुरळ उठली होती. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'मला कपड्यांची ऍलर्जी आहे. त्यासोबत तो फोटो शेअर करताना आपल्या पायांवर उठलेले पुरळही (Allergy) तिनं दाखवले.

त्यामुळे आपल्याला कपडे घालून ही ऍलर्जी झाली असल्याचं त्या पोस्टमधून तिने सांगितले. जर तिने पुर्ण कपडे घातले तर तिला अशी ऍलर्जी होते, असं सांगत तिनं आपल्या आजाराबद्दल लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे

Crime: नवविवाहितेवर जीवघेणा हल्ला, भरदिवसा धाडधाड गोळ्या झाडल्या; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT