Urfi Javed New Fashion: फॅशन सेन्सेशन अभिनेत्री ऊर्फी जावेद कधीच हटके फॅशन करण्याचं सोडत नाही. कुठे ही तिला पापराझी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हजरच असतात. उर्फीची फॅशन सध्या सर्वत्रच चर्चेत आहे. अनेक अभिनेत्री तिला कॉपी करण्याचा ही आता प्रयत्न करू लागले. अशातच आणखी एक तिने फॅशन करत आपली चर्चा जोरात केली आहे.
कधी फुलं, झाडांची पानं, ब्लेड, साखळी तर कधी मोबाईलचे सिम कार्ड वापरत तिने आपली फॅशन ट्रिक वापरली आहे. आता पुन्हा एकदा हटके फॅशन करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ऊर्फीने आता डायनिंग टेबलच्या कव्हरपासून ड्रेस बनवला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
'विरल भय्यानी' या सोशल मीडिया पेजवरुन उर्फीच्या नव्या लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा बिकिनी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसखाली तिने ट्रान्सपरंट स्कर्ट परिधान केला आहे. हा स्कर्ट डायनिंग टेबलच्या कव्हरपासून बनवल्याचं उर्फीने म्हटलं आहे. हाय पोनी बांधत उर्फीने हेअरस्टाइल केली आहे. मोठे कानातले व साजेसा मेकअप करुन तिचा ग्लॅमरस लूक आहे.
उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून ट्रोलिंग करणं काही सोडलेलं नाही. एक नेटकरी म्हणतो,' तु असे ड्रेस घालते म्हणूनच पॉलिथीन बॅन केलं', तर आणखी एक युजर म्हणतो, 'कंडोमपासून कधी ड्रेस बनवणार?', 'स्वस्तात मनोरंजन आहे उर्फीचं' म्हणत एका नेटकऱ्याने तिची खिल्ली उडवली आहे. सोबतच 'नो टू प्लॅस्टिक' म्हणत आणखी एका युजरने तिला ट्रोल केलंय.
कपड्यांवरुन ट्रोल होणारी उर्फी आता तिच्या विधानांमुळे ही चर्चेत राहते. उर्फी समाजातील काही घडामोडींवर आपलं स्पष्ट आणि परखड मत मांडते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.