Urfi Javed New Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed New Look: उर्फीच्या सौंदर्याचं होतंय तोंडभरून कौतुक; नेटकरी म्हणाले," स्वत: सुधारली, पण..."

Urfi Javed Fashion: सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर उर्फी जावेदचं नाव घेतलं की तीच्या अतरंगी कपड्याची चर्चा होते. उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलने सर्वत्र ओळखली जाते.

Manasvi Choudhary

सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर उर्फी जावेदचं नाव घेतलं की तीच्या अतरंगी कपड्याची चर्चा होते. उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलने सर्वत्र ओळखली जाते. उर्फी लोकप्रिय झाली ती म्हणजे बोल्ड अन् चित्रविचित्र स्टाईलमुळे. खरं तर याच माध्यमातून उर्फी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. उर्फीने तिच्या हटके अंदाजाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उर्फीने कोणता लूक केला नाही असं म्हणताच येणार नाही. घरगुती सर्वंच गोष्टींचा वापर करून उर्फीने तिचे कपडे तयार केले आहेत. यामुळेच उर्फी अनेकदा ट्रोल देखील झाली आहे.

मात्र आता उर्फीच्या सौंदर्याचं कौतुक होत आहे. तुम्हाला देखील याबाबत विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. उर्फीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये उर्फीं पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे.पिवळ्या प्रिटेंड ड्रेसमध्ये उर्फीने मोकळे केस अन् मेकअप लूक केला आहे. सोशल मीडियावर उर्फीच्या या सौंदर्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

उर्फीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. तर अनेकांनी कमेंट करत, उर्फीने पूर्ण कपडे घालायला सुरूवात केली. दुसऱ्याने, दुसऱ्यांना बिघडवून स्वत: मात्र सुधारली. तर आणखी एकाने, आम्हाला विश्वास बसत नाही की उर्फीने पूर्ण कपडे घातलेय... असं म्हणत उर्फीच्या लूकला चक्क पसंती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT