Urfi Javed  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed : प्लॅस्टिक फॉइलमधला उर्फी जावेदचा नवीन लूक पाहून व्हाल थक्क

उर्फी जावेदने तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर नवीन लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने प्लॅस्टिक फाइलने बनवलेला स्लिवलेस क्रॉप-टॉप घातला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फॅशननिस्टा आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला(Urfi Javed) नवनवीन प्रयोग करून यशाचे शिखर गाठायचे आहे. यासाठी नेहमीच उर्फी हटके स्टाईल करत असते. उर्फी काय लढाईच्या तयारीसाठी असं करते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. उर्फी वेगवेगळ्या वस्तूंच्या माधमातून बनलेला पोशाख परिधान करते. ज्यामध्ये ती कधी ब्लेड तर कधी साखळी गुंडाळून तिचा हटके स्वॅग दाखवते. आता देखील उर्फी जावेदचा भन्नाट लूक समोर आला आहे.

अनेकदा विविध स्टाईलचे कपडे आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडीने ड्रेस डिझाईन करून घेत असतो. परंतु फॅशनच्या बाबतीत सर्वसामान्याची विचारसरणी जेथे संपते तेथून फॅशननिस्टा उर्फीची स्टाईल सुरू होते असं बोलायला हरकत नाही.(Social Media) सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या बिनधास्त उर्फीचा प्लॅस्टिक फाइलमधला लूक समोर आला आहे. उर्फीचा हा लूक चाहत्याचं लक्ष वेधून घेत आहे.

उर्फी जावेदने तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर नवीन लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने प्लॅस्टिक फाइलने बनवलेला स्लिवलेस क्रॉप-टॉप घातला आहे. यासह तिने ब्ल्यू डेनिम जीन्सने तिचा लूक पूर्ण केला आहे. तिने या नव्या लूकसाठी अनेक प्रयोग केले आहेत. उर्फीने परिधान केलेल्या या क्रॉप-टॉपला प्रभावित करण्यासाठी फुलाचा देखील समावेश केला आहे. योबतच तिने केसांची हायपोनी, एअररिंग्स आणि हलक्या मेकअपसह तिचा हटके लूक पूर्ण केला आहे.

उर्फी जावेदने तिच्या या लूकचा रील बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फी अॅटीट्यूड मध्ये चालताना दिसते आहे. उर्फीचा हा स्वॅग चाहत्यांना घायाळ करतो आहे. उर्फीच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी तिच्या या नवीन प्रयोगाचे कौतुक केलं आहे, तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केले आहे. हा असा कसा ड्रेस आहे? असं एकाने तिला कमेंट करत विचारले आहे तर काही नेटकऱ्यांनी फायर, लव्ह ईमोजी कमेंट केले आहे.

उर्फी जावेद ही फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. अनेकदा उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे इंटरनेटचा पारा वाढवते. फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फीच्या नवीन प्रयोगाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. उर्फी जावेद ही तिच्या हटके आणि बिनधास्त शैलीमुळे चाहत्यांच्या पंसतीस आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT