Urfi Javed And Chitra Wagh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Vs Chitra Wagh: उर्फी जावेदच्या निशाण्यावर पुन्हा चित्रा वाघ, 'आता चित्रा वाघ गप्प का?'...

उर्फी जावेदने केले चित्र वाघ यांना पुन्हा टार्गेट.

Pooja Dange

Urfi Javed - Chitra Wagh Controversy: उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्र वाघ यांच्या गेल्या काही दिवसांपासून शा‍ब्दिक युद्ध सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीची पोलिसात आणि महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती. यावर उर्फीने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. आता उर्फी एक पोस्ट शेअर केअर चित्रा वाघ यांना प्रश्न केला आहे.

भाजपच्या तामिळनाडू राज्यातील नेत्या आणि अभिनेत्री गायत्री रघुराम यांनी भाजप पक्षाला रामराम केला आहे. गायत्री यांनी सांगितले की, भाजप पार्टी महिला सुरक्षित नाहीत,म्हणून मी पार्टी सोडत आहे.

उर्फी जावेदने त्यांची ही बातमी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. तसेच इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना प्रश्न केला आहे. उर्फीने लिहिले आहे की, 'आता चित्रा वाघ गप्प आहेत! यांचे तर कपडे सुद्धा चांगले आहेत यार आणि तुमच्याच पार्टीतील लोकांमुळे हे झाले आहे! जिथे आवाज उठवायला हवा तिथे नाही उठवणार.'

महाराष्ट्रात चित्रा वाघ आणि उर्फी जावेद हा वाद चांगलाच रंगला आहे. अनेकजण म्हणत आहेत की चित्र वाघ यांनी चुकीच्या मुलीशी पंगा घेतला आहे. चित्रा वाघ यांना महिला आयोगाकडे देखील उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु उर्फीने तिला विनाकारण त्रास देत असल्याचे म्हणत महिला आयोगाकडे दाद मागितली. चित्रा वाघ यांना महिला आयोगाने समर्थ दिले नाही.

Urfi Javed Instagram Story

या सगळ्या वादात उर्फीने तिचे काम सुरू ठेवले आहे. तिने हा वाद रंगात असताना तिच्या पद्धतींत याला विरोध केला होता. उर्फीने नुकतेच इन्स्टाग्राम स्टोरीवर काही विडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने थंडी आणि कपड्यांमुळे अॅलेर्गी झाल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

SCROLL FOR NEXT