Ramcharan- Upasna Children Photos Viral Instagram
मनोरंजन बातम्या

Ramcharan- Upasna Baby Photos: रामचरण- उपासना रूग्णालयातून बाहेर येताच लेकीवर फुलांचा वर्षाव, मुलीसाठी खास धून, व्हिडीओ व्हायरल

Ramcharan- Upasna Daughter Photos: अभिनेता, त्याची पत्नी आणि गोंडस बाळ रुग्णालयातून बाहेर येतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Ramcharan- Upasna Children Photos Viral: टॉलिवूड सुपरस्टार आणि RRR अभिनेता रामचरणची पत्नी उपासना कमिनेनी हिने नुकताच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. २० जूनला एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर दोघांवरही कौतुकाचा वर्षाव झाला. अखेर रामचरणच्या पत्नीला काल रुग्णालयातून अखेर डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या अभिनेता, त्याची पत्नी आणि गोंडस बाळ रुग्णालयातून बाहेर येतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत रामचरण आणि पत्नी उपासना रुग्णालयाच्या बाहेर उभी असलेली दिसत आहे. रामचरणच्या हातात त्याची लेक आहे. यावेळी त्यांच्या सोबत रामचरणची आई सुरेखा देखील दिसत आहे. यावेळी रामचरणने माध्यम कर्मींचे आभार देखील मानले.

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, राम चरण आणि त्याची पत्नी रुग्णालयातून बाहेर येताच चाहत्यांनी दोघांवरही गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षावासोबतच अभिनंदनाचा वर्षाव केला. सोबतच यावेळी रामचरणने आपल्या बाळासोबतच पत्नीच्या हेल्थविषयी अपडेट दिली.

राम चरणने आपल्या लाडक्या लेकीसाठी विशेष तयारी केली आहे. मुख्य बाब म्हणजे, अभिनेत्याने आपल्या गोंडस लेकीसाठी पाळण्याची खरेदी केली आहे. सोबतच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, RRR गायक काला भैरव यांनी राम चरणच्या मुलीसाठी एक खास धून तयार केली आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्याच्या लेकीची बरीच चर्चा सुरू आहे.

राम चरण आणि पत्नी उपासना कमिनेनी यांना लग्नाच्या ११ वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झालाय. त्यामुळे सध्या दोघांच्या घरच्यांचा आनंद द्विगुणित झालाय. लाडक्या अभिनेत्याला कन्यारत्न झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी अनेक ठिकाणी मिठाईचे वाटप करत फटाके फोडत एकच जल्लोष केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

SCROLL FOR NEXT