Udta Teer Review saam tv
मनोरंजन बातम्या

Udta Teer Review: देशभक्ती, कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका! आयुष्मान-साराच्या 'उड़ता तीर'चा जाणून घ्या रिव्ह्यू

Udta Teer Movie Review: आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या उडता तीर चित्रपटात देशभक्ती, कॉमेडी आणि सस्पेन्सचा तडका आहे.

Sakshi Sunil Jadhav

Udta Teer Movie Review: बॉलिवूडमध्ये देशभक्ती , अ‍ॅक्शन आणि कॉमेडी असलेले अनेक चित्रपट आलेले आहेत. आता अभिनेता आयुष्यमान खुराना आणि सारा अली खान यांचा 'उड़ता तीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात जासूसी मिशन, चुकीची ओळख, सस्पेन्स आणि विनोदाचा चांगला मेळ पाहायला मिळतो. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कितपत यशस्वी ठरलाय हे जाणून घेऊयात.

नेमकी काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटात आयुष्मान खुराना याने विक्रांतची भूमिका साकारली आहे. विक्रांत स्वत:ला भारतीय गुप्तचर यंत्रणेचा CTS अधिकारी समजत असतो. मात्र, खरी गोष्ट वेगळीच असते. तो प्रत्यक्षात बिलाल नावाचा पाकिस्तानी एजंट असतो. एका अपघातानंतर त्याची स्मरणशक्ती जाते आणि तो स्वत:च्याच लोकांच्या विरोधात उभा राहतो. या गोंधळातूनच चित्रपटात अनेक मजेशीर प्रसंग आणि ट्विस्ट पाहायला मिळतात.

आयुष्मानचा अभिनय लक्षवेधी

आयुष्मान खुराना याने दोन वेगवेगळ्या ओळखीमध्ये अडकलेल्या व्यक्तीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. त्याचा अभिनय आणि कॉमेडी टाइमिंग चित्रपटाला वेगळी रंगत आणते. राहुल बोस यांचा विनोदी अंदाज विशेष लक्षवेधी आहे. त्यांच्या अभिनयामुळे अनेक प्रसंग अजून मजेशीर झाले आहेत.

सारा अली खान आणि स्मिता तांबे यांनीही आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे निभावल्या आहेत. राम कपूर, बृजेंद्र काला आणि गुलशन ग्रोव्हर यांची साथही चित्रपटाला मिळाली आहे.

दिवंगत मुकुल देव यांची खास आठवण

दिवंगत अभिनेता मुकुल देव यांची चित्रपटातली उपस्थिती विशेष आहे. त्यांच्या अभिनयामुळे कथेला बळ मिळतं. हा चित्रपट त्यांच्या आठवणींशी जोडलेला भावनिक अनुभवही देतो.

चित्रपटातलं काय आवडेल आणि काय खटकते?

चित्रपटाची सुरुवात थोडी संथ वाटते. कथा आणि पात्र समजून घेण्यासाठी सुरुवातीला वेळ लागतो. मध्यंतरानंतरही काही ठिकाणी गती कमी होते. मात्र त्यानंतर कथा पुन्हा वेग पकडते. छोटे-छोटे विनोदी प्रसंग, ट्विस्ट आणि कलाकारांचा अभिनय मनोरंजन करतात. चित्रपटातली गाणी फारशी प्रभावी नाहीत. मात्र पार्श्वसंगीत चांगले आहे. सिनेमॅटॉग्राफी आणि एडिटिंग समाधानकारक आहे.

चित्रपट पाहावा का?

दिग्दर्शक आकाश ए. कौशिक यांनी देशभक्ती, अ‍ॅक्शन, सस्पेन्स आणि कॉमेडी यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी कथा संथ वाटत असली तरी आयुष्मानचा अभिनय आणि राहुल बोस यांची कॉमेडी चित्रपटाची जमेची बाजू आहे. हलकीफुलकी कॉमेडी आणि वेगळ्या कथानकाचे चित्रपट आवडत असतील, तर 'उड़ता तीर' एकदा पाहायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरापासून ऑफिसपर्यंत दिवसभर एसीमध्ये राहताय? आरोग्यावर होणारे ७ घातक परिणाम, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले आमदार कौस्तुभ गावडे भाजप नेत्यांच्या बैठकीला

Nilesh Rane: लायकीत राहायचं… निलेश राणे कडाडले, भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांना थेट सुनावलं!

Pradeep Purnekar Case: पूर्णेकरांच्या हत्येच्या कटात मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचा सहभाग, ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

Samruddhi Expressway Protest: समृद्धी महामार्ग ठाकरेसेनेचा रास्तारोको; नितीन देशमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं!

SCROLL FOR NEXT