Udit Narayan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Udit Narayan : "जबरदस्ती गर्भाशय काढलं अन्..."; सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप, FIR दाखल

FIR Filed Against Udit Narayan : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. एक्स पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. नेमंक प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

उदित नारायण बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आहेत.

उदित नारायण यांच्या एक्स पत्नीने त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केले आहे.

जबरदस्ती गर्भाशय काढल्याचा आरोप उदित नारायण यांच्या एक्स पत्नीने त्यांच्यावर केला आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यांची पहिली पत्नी रंजना नारायण यांनी मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी उदित नारायण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यात उदित नारायण यांची दुसरी पत्नी दीपा नारायण, उदित नारायण यांचे भाऊ संजय कुमार झा आणि ललित नारायण झा यांची नावे देखील आहे. या चौघांनी मिळून जबरदस्तीने गर्भाशय काढून टाकल्याचा आरोप रंजना नारायण यांनी केला आहे.

उदित नारायण यांची पहिली पत्नी रंजना नारायण वकील करुणकांत झा यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिने सांगितले की, ती सुपौल जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि तिच्या वडिलांचे नाव चंद्रकांत झा आहे. माझा विवाह 7 डिसेंबर 1984 रोजी हिंदू रितीरिवाजानुसार गायक उदित नारायण यांच्याशी झाला. त्यानंतर 1985ला करिअर करण्यासाठी उदित नारायण मुंबईला गेले. तिथे त्यांनी दीपा नारायणसोबत दुसरे लग्न केले.

उदित नारायण यांच्या पहिल्या पत्नीचे त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप

रंजनाने उदित नारायण यांच्यावर आरोप केला की, 1996 मध्ये उदित नारायण त्यांच्या भावांसह तिला दिल्लीतील एका रुग्णालयात घेऊन गेले, जिथे तिचे गर्भाशय काढून टाकण्यात आले. दीपा देखील तिथे उपस्थित होती, परंतु कोणीही काहीही बोलले नाही आणि तिला अशा कोणत्याही घटनेची माहिती नव्हती. रंजनाच्या म्हणण्यानुसार, 2006 मध्ये ती मुंबईत आली. तेव्हा तिच्या पतीने आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला घरात येऊ दिले नाही. त्यानंतर, ती नेपाळमधील तिच्या सासरच्या घरी गेली, परंतु तिथूनही त्यांना हाकलून लावण्यात आले. तेव्हापासून ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहत आहे.

रंजना नारायण यांनी सुपौल कुटुंब न्यायालयात उदित नारायण यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. याची सुनावणी लवकरच होणार आहे. शिवाय रंजनाने महिला आयोगाकडे गायकाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर, उदितने ती त्याची पत्नी असल्याचे मान्य केले आणि तिला सोबत ठेवण्याचे आश्वासन दिले, परंतु आजपर्यंत तिला तिचा हक्काचा आदर मिळालेला नाही. तिला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान, रंजनाची तक्रार 30 वर्षे जुनी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे, ते प्रथम जुन्या प्रकरणाची चौकशी करतील आणि नंतर त्यात आढळलेल्या तथ्यांवर आधारित एफआयआर दाखल करून कारवाई करतील.

उदित नारायण यांचे दुसरे लग्न

उदित नारायण यांनी दुसरे लग्न दीपा गहतराज यांच्यासोबत केले. त्यांना 1987 मध्ये मुलगा झाला. ज्याचे नाव आदित्य नारायण आहे. आदित्यही बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगरपालिका निवडणुकीत अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला सवाल

Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

देशातील परिस्थिती किती गंभीर? सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिली अपडेट, पाकिस्तानला म्हटलं दलाल

Nepal: देशाला मिळणार नवे पंतप्रधान; राम नवमीच्या दिवशीच शहांचा शपथविधी

पुण्यात ड्रग्जच्या नशेसाठी फुलचंद पान, पानांआडून अमली पदार्थांची तस्करी

SCROLL FOR NEXT