Dipika Kakar- Shoaib Ibrahim Spot With Their Baby Boy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar-Shoaib Ibrahim : दीपिका कक्करला मिळाला रूग्णालयातून डिस्चार्ज, शोएबने केली बाळाच्या आगमनाची घरी जय्यद तयारी

Dipika Kakar- Shoaib Ibrahim Spot With Their Baby Boy : दिपिकाने गोंडस मुलाला जन्म दिला.आज ते त्यांच्या बाळाला घेऊन घरी नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dipika Kakar-Shoaib Ibrahim Take Their Baby Home : दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम काही दिवसांपूर्वी आई-बाबा झाले. दिपिकाने गोंडस मुलाला जन्म दिला.आज ते त्यांच्या बाळाला घेऊन घरी नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'बिग बॉस' विजेती दिपिका कक्करने २१ जून रोजी मुलाला जन्म दिला. ही माहिती नवरा शोएबने सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली.त्याचबरोबर ही प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असल्याचेही त्याने सांगितले होते. त्यामुळे चाहत्यांनी बाळाबद्दल काळजी व्यक्त केली होती. पण आता ते बाळाला घरी घेऊन गेले आहेत. (Latest Entertainment News)

सोमवारी सकाळी दिपिका आणि शोएब त्यांच्या बाळाला घेऊन घरी घेऊन जाताना स्पॉट झाले. यावेळी शोएबने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि दिपिका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फारचं सुंदर दिसत होती. शोएबच्या हातात बाळ आहे.पण व्हिडिओमध्ये बाळाचा चेहरा दिसत नव्हता. दिपिकाच्या चेहऱ्यावर आईपणाचा चांगला ग्लो दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

शोएब सोशल मीडियावरुन नेहमी दिपिका आणि बाळाच्या आरोग्याबाबत माहिती शेअर करत होता. काही दिवसांपूर्वी बाळाला काचेतून बाहेर आणल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. अनेकदा दिपिकाचे हॉस्पिटमधील फोटोही शेअर केले होते. तर आता २० दिवसानंतर बाळाला घरी घेऊन जातानाचा आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. शोएबने सोशल मीडियावरुन सकाळी दिपिकासोबतचा फोटो शेअर करत 'रेडी टू गो होम' असं लिहलं आहे. दिपिका-शोएबच्या मुलाचं घरी जंगी स्वागत होणार आहे. घरातील सजावटीचा फोटोही शोएबने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी दिपिकाने इंडस्ट्रीत काम न करण्याची घोषणा केली होती.त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. तर शोएबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो सध्या 'अजूनी' या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT