TV actor Arjun Bijlani car accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

Actor Car Accident: टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या कारला अपघात झाला. ‘चुंबक कॉलनी’च्या प्रमोशनवरून परतताना ही घटना घडली. सुदैवाने अर्जुन आणि त्याच्यासोबतचे सर्वजण सुखरूप आहेत.

Shruti Vilas Kadam

Actor Car Accident: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अर्जुनच्या कारला नुकताच अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात अभिनेता आणि त्याच्यासोबत प्रवास करणारे सर्वजण सुखरूप आहेत. अर्जुनच्या टीमने शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी याबाबत माहिती देत चाहत्यांना काळजी करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

प्रमोशनवरून परतताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन बिजलानी त्याच्या आगामी नेटफ्लिक्स प्रोजेक्ट ‘चुंबक कॉलनी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनल कार्यक्रमासाठी तो ‘इंडियन गेम शो’मध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमानंतर परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला. अपघाताची माहिती समोर आल्यानंतर अर्जुनच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. मात्र, त्याच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत अभिनेता सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसल्याचंही टीमने स्पष्ट केलं आहे.

‘चुंबक कॉलनी’मुळे चर्चेत

अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘चुंबक कॉलनी’ या नेटफ्लिक्स प्रोजेक्टच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याआधी तो ‘राइज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. ‘मिले जब हम तुम’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘नागिन’ आणि ‘रूहानियत’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांमुळे अर्जुनने टीव्ही विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मोनी रॉयसोबतच्या चर्चांमुळेही होता चर्चेत

काही दिवसांपासून अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मोनी रॉय यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. दोघे एकत्र डिनरसाठी गेल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आलं होतं. मात्र, अर्जुनने या चर्चांना फेटाळून लावत मोनी ही आपली जवळची मैत्रीण असल्याचं सांगितलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT