Tumbbadchi Manjula Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tumbbadchi Manjula: हे डोळे कुणाचे..? गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तुंबाडची मंजुळा'

Tumbbadchi Manjula Poster: गुढीपाडव्याच्या निमित्ताने रिलीज झालेल्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दल रहस्य वाढले. डोळे, गावकरी आणि काळा पोपट पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Tumbbadchi Manjula Poster: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या तुंबाडची मंजुळा या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Zee Studios प्रस्तुत या चित्रपटाने वेगळ्या आणि रहस्यमय प्रमोशनमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या निमित्ताने चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्या पोस्टरमध्ये एका जुन्या दारावर ठेवलेले काही हात आणि दाराआड दिसणारी एक गूढ आकृती पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचे आणखी एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे ठळकपणे दाखवण्यात आले आहेत. तसेच एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळ्या रंगाचा पोपटही विशेष लक्ष वेधून घेतो. या पोस्टरमुळे “हे डोळे नेमके कुणाचे आहेत?”, “हे कलाकार कोण आहेत?” आणि “काळ्या पोपटामागचे रहस्य काय?” असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

यासोबतच “गावात सारी चर्चा रे, गप्पांना आलाय ऊत! भुतानं झाडाला धरलंय की झाडानं धरलं भूत” अशा गाण्याच्या ओळीही ऐकू येत असल्याने चित्रपटातील वातावरण अधिकच गूढ आणि थरारक वाटू लागले आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

या पोस्टरबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “तुंबाडची मंजुळा हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अनेक वर्षांनंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा प्रोजेक्ट आहे. चित्रपटाची कथा आणि विषय अत्यंत वेगळा आणि रंजक आहे. त्यामुळे प्रत्येक प्रमोशनल गोष्ट ही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी असावी, या उद्देशाने आम्ही हे पोस्टर्स सादर करत आहोत.”

या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी विविध कोरगांवकर यांनी सांभाळली आहे. रहस्य, थरार आणि वेगळ्या कथानकाने सजलेला हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता ‘तुंबाडची मंजुळा’ नेमकी काय कथा सांगणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Belly Fat Loss: पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल, घरीच करा हे ५ सोपे योगा प्रकार

भल्या पहाटे पुन्हा भूकंपाचे हादरे; जमीन थरथरली, लोक घर सोडून पळाले

Accident: मध्यरात्री हिट अँड रनचा थरार, भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: भिवंडी शहरातील फातिमानगर येथील भंगाराच्या गोदामाला आग

Company Fire: पगार कमी आल्यानं राग अनावर झाला; संतापलेल्या कर्मचाऱ्यानं कंपनीच जाळली

SCROLL FOR NEXT