Tumbbadchi Manjula  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tumbadchi Manjula: आगळ्या-वेगळ्या गावाची सुरेल सफर; सई ताम्हणकरच्या 'तुंबाडची मंजुळा’चं पहिलं गाणं रिलीज

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळा चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ गाणं रिलीज झालं आहे. राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांच्या सुरांनी सजलेलं हे गाणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.

Shruti Vilas Kadam

Tumbadchi Manjula: झी स्टुडिओज निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता या चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटाने आता गाण्याच्या माध्यमातून गावाचं एक वेगळं, रंगतदार चित्र उभं केलं आहे.

या गाण्याचं खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध गायक राहूल देशपांडे आणि गोड आवाजाची गायिका आर्या आंबेकर यांची जोडी. या दोघांनी प्रथमच एकत्र गायलेलं हे गाणं प्रेक्षकांसाठी खास ठरत आहे. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता आणि सहजता गाण्याला एक वेगळी उंची देते.

गाण्याबद्दल बोलताना राहुल देशपांडे म्हणाले की, हे गाणं आधुनिक संगीतासोबतच गावाकडच्या मातीचा सुगंध जपणारं आहे. शब्द आणि चाल आजच्या काळाशी सुसंगत असून प्रेक्षकांना ते नक्की आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आर्या आंबेकरनेही हे गाणं मनाला भिडणारं असल्याचं सांगत, अशा वेगळ्या धाटणीच्या गाण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतल्याचं सांगितलं.

‘असं वेगळं गाव’ हे गाणं गावातील लोकजीवन, त्यांची मस्ती, नात्यांमधील ऊब आणि आपुलकी यांचं सुंदर चित्रण करतं. गुण्यागोविंदाने नांदणारं, आनंदाने बहरलेलं गाव या गाण्यातून जिवंत होतं. कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं असून हिरवाईने नटलेला परिसर आणि साधेपणाचं सौंदर्य यामुळे गाण्याला वेगळाच आकर्षण लाभलं आहे.

या गाण्याचे शब्द विक्रम एडके यांनी लिहिले असून असीम कुऱ्हेकर, प्रतीक केळकर आणि तेजस जोशी या संगीतकार त्रयींनी ते संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटाचं लेखन ऋषिकेश तुरई यांनी केलं असून दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केलं आहे. यात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णीयांसह अनेक कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT