Tula Shikvin Changalach Dhada Special Episode Saam TV
मनोरंजन बातम्या

Tula Shikvin Changalach Dhada Update: अक्षरा-अधिपतीच्या लग्नाला यायचं हं! तुला शिकविनच चांगला धडामध्ये रंगणार शाही विवाहसोहळा

Akshara - Adhipati: अक्षरा आणि अधिपतीचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे.

Pooja Dange

Akshara - Adhipati Grand Wedding:

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नाची. अक्षरा आणि अधिपतीचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. तसेच सोशल मीडियावर येणारे मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवत आहेत.

अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाचा शाही थाट पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटणार आहे. भुवनेश्वरीच्या हट्टासाठी हा शाही सोहळा होणार आहे. अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा १ ऑक्टोबरला २ तासांचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. या भागाचे अनके प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपतीसोबत लग्नासाठी तयार झाली आहे. तर अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच भुवनेश्वरीने हा घाट घातला असल्याने खूप खुश आहे.

लग्नातच इरा खोट बोलल्याचं अक्षराला कळणार असल्याचे प्रोमो व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे. त्यामुळे अक्षराला याचा खूप मोठा धक्का बसणार आहे. आता अक्षर, अधिपतीशी लग्नगाठ बांधेल का ? सगळं खरं कळल्यावर अक्षरा लग्नाला तयार होईल का हे बघणं रंजक ठरणार आहे.

झी मराठीच्या आणखी एका प्रोमोमध्ये अधिपती अक्षराच्या वडिलांना त्याच्या पायाला हात लावू देत नाही. तर भुवनेश्वरी त्याला सांगते, 'ही तर रीत आहे.' आता अधिपती कोणाचा मान राखणार भुवनेश्वरीचा की होणाऱ्या सासऱ्यांच्या?

भुवनेश्वरीने राजशाही घाट घातलाच आहे तर लग्नसमारंभ भव्य होणार हे नक्कीच. झी मराठीवरील या मालिकेचा १ ऑक्टोबरला २ तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना एक भव्य लग्न सोहोळा पाहता येणार आहे. या भागात एक खास सरप्राईझ पण असणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे बाणेरमध्ये वाहतूक ठप्प

Nandurbar : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेचा प्रेरणादायी निर्णय; जुळ्या मुलांचं सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन, VIDEO

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट अन् हार्ट अटॅकमध्ये फरक; कोणती लक्षणे दिसतात?

WhatsApp Business Summit: झटपट होईल डील; व्‍हॉट्सअ‍ॅप छोट्या व्यवसायिकांचा वाढवणार बिझनेस

Deepika Padukone: आधी 'स्पिरिट' आता 'कल्की 2'; दीपिका पदुकोणची आणखी एका मोठ्या चित्रपटातून एक्झिट

SCROLL FOR NEXT