Salaar Twitter Review Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Twitter Review: 'रटाळ कथानक अन् सुमार ॲक्टिंग...' म्हणत नेटकऱ्यांनी प्रभासला केलं ट्रोल; तरीही ‘सालार’ची सोशल मीडियावर क्रेझ

Salaar Film: ‘आदिपुरुष’नंतर प्रभासचा ‘सालार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांनी फर्स्ट शोला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावलेली दिसत आहे. अनेक युजर्सने सोशल मिडियावर प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे.

Chetan Bodke

Salaar Twitter Review

‘आदिपुरुष’नंतर प्रभासचा ‘सालार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रभास ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याचा तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही प्रमाणात फ्लॉप ठरल्यानंतर सर्वांनाच आता ‘सालार’बद्दल उत्सुकता आहे. चित्रपटाचा आज ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ सकाळी लवकर होता.

प्रेक्षकांनी फर्स्ट शोला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावलेली दिसत आहे. अनेक युजर्सने सोशल मिडियावर प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे.चला तर जाणून घेऊया प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटला?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर फिल्म ॲनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे, 'या धडाकेबाज ॲक्शन चित्रपटामध्ये प्रभासने देवाची भूमिका खूप उत्कृष्ट रित्या साकारली आहे. प्रशांत नील यांनीही चित्रपटामध्ये ॲक्शन सीन्स उत्तम दिले आहेत. असं म्हणत फिल्म ॲनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी चित्रपटाचे, कलाकारांच्या अभिनयाचे आणि कथानकाचे तोंडभरुन कौतुक केले. फिल्म ॲनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी चित्रपटाला ३.५ इतके स्टार्स दिले आहेत. (Tollywood)

तर एक युजर म्हणतो, ‘ ‘सालार’ इज द बेस्ट मुव्ही, प्रभासचा खूप सुंदर अभिनय, जबरदस्त क्लायमेक्स...’ तर ५ स्टार दिले आहेत. सोबतच आणखी एक युजर म्हणतो, ‘ब्लॉकबस्टर ‘सालार’, एकदा तरी आवश्य पाहावा असा चित्रपट...’ असं एका युजरने कमेंट केली आहे. त्यासोबतच एका युजरने तर प्रभासला प्रचंड ट्रोल केले आहे. सोबतच चित्रपटाचे कथानक आणि त्याच्या अभिनयावरुनही त्याला ट्रोल केले आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, ‘मी सध्या न्यूयॉर्कमध्ये चित्रपट पाहतोय, ४५ मिनिट झाले आहेत, मला काहीच चित्रपट कळाला नाही. रटाळ कथानक आणि सुमार ॲक्टिंग’ असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केले.

'सालार पार्ट-1 सीझफायर'ची कथा दोन भागांमध्ये विभाजित केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार पार्ट-1 सीझफायर' ची निर्मिती होंबाळे फिल्सच्या बॅनरखाली केली आहे. २२ डिसेंबरला अर्थात आज चित्रपट रिलीज झाला असून हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. चित्रपटामध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रृती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू प्रमुख भूमिकेत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT