Samantha And Naga Chaitanya  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu: घटस्फोटानंतरही नागाचैतन्याला समांथाची काळजी, फोन करत प्रकृतीची विचारपूस

नागा चैतन्यने समंथाला फोन करून तिच्या तब्येतीची विचारपूस केली होती. या बातमीने दोघांचेही चाहते खूपच आनंदीत झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samantha Ruth Prabhu: नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांचा प्रेमकथेपासून सुरू झालेला हा प्रवास घटस्फोटानंतरही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दोघेही अनेकदा त्यांच्या कामामुळे तसेच वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत राहतात. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे चित्रपटसृष्टीतील दिग्गज जोडप्यांपैकी एक आहे, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दोघांच्या प्रेमकथेपासून सुरू झालेला हा प्रवास घटस्फोटानंतरही थांबण्याचे नाव घेत नाही.

दोघेही अनेकदा त्यांच्या कामामुळे तसेच वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत राहतात. अलीकडेच, सोशल मीडियावर चाहत्यांना समांथाच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर सर्वजण समंथाबद्दल चिंता व्यक्त करत होते.

पण विशेष बाब म्हणजे चिंता व्यक्त करणाऱ्यांमध्ये एक्सहजबेंड आणि अभिनेता नागा चैतन्यचाही समावेश होता. ज्याने दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तिच्या 'यशोदा' चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या समंथा रुथ प्रभूने नुकताच स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि खुलासा केला की ती मायोसिटिसशी झुंज देत आहे.

या बातमीनंतर समांथाचे चाहते आणि तिचे जवळचे नातेवाईक चिंतेत आले आहे. पण आता एक रिपोर्ट समोर येत आहे, ज्यामध्ये तिचा माजी पती नागा चैतन्य देखील समंथाच्या तब्येतीची काळजी करत असल्याचे सांगितले जात आहे आणि त्याने समंथाला फोन करून तिच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समंथाची तब्येत ठीक नाही, पण ती हळूहळू बरी होत आहे. तिच्या आजाराचे निदान झाल्यानंतर नागा चैतन्य तसेच त्याचे कुटुंबीय खूप अस्वस्थ झाले होते.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, 'नागा चैतन्यने समंथाला फोन करून तिच्या तब्येतीची विचारपूस केली होती. या बातमीने दोघांचेही चाहते खूपच आनंदीत झाले होते, कारण दोघांमध्ये सर्वकाही सामान्य असावे अशी त्यांची इच्छा आहे.

'दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री समंथा प्रभूने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिने मायोसिटिस आजारासोबत झुंज देत असल्याचे सांगण्यात आले. समंथाच्या या पोस्टवरुन, चाहते आणि सहकारी कलाकार तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

समांथाने ड्रिपसोबत तिचा फोटो शेअर केला आणि लोकांना सांगितले की तिला काही महिन्यांपूर्वी या आजाराची माहिती मिळाली. समंथा त्याविषयी लिहिते, 'काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाची ऑटोइम्यून स्थिती असल्याचे निदान झाले. मला वाटले की मी बरे झाल्यानंतर याबद्दल सांगेन, परंतु याक्षणी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत आहे. मी लवकरच पूर्णपणे बरी होईन, असा विश्वास डॉक्टरांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT