Jr NTR Returns To India After Powerful Earthquake Instagram
मनोरंजन बातम्या

Japan Earthquake: जपानमधील भूकंपाने Jr.NTR हादरला, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...

Junior NTR News: जपानमध्ये भूकंपाची परिस्थिती उद्भवण्याच्या एक दिवस आधीच दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर जपानमधून भारतात सुखरुप पोहोचला आहे.

Chetan Bodke

Jr NTR Returns To India After Powerful Earthquake

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाने जपान हादरला आहे. या भूकंपामध्ये अनेक शहरातील रस्त्यांवर भेगा पडल्या तर काही ठिकाणी विजेचे खांब देखील उन्मळून पडले.

जपानमध्ये भूकंपाची परिस्थिती उद्भवण्याच्या एक दिवस आधीच दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) जपानमधून भारतात सुखरुप पोहोचला आहे. अभिनेता जपानमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गेला होता. भूकंपाच्या एक दिवस आधीच भारतामध्ये परतल्याची माहिती त्याने ट्वीट करत दिली आहे. (Actor)

अभिनेत्याने जपानमधून भारतामध्ये परतल्यानंतर चाहत्यांसोबत एक ट्वीट शेअर केलं आहे. "मी आज जपानहून भारतामध्ये परत आलोय. दरम्यान, तिथे आलेल्या भूकंपाची बातमी ऐकून मला धक्काच बसला आहे. गेला आठवडाभर मी जपानमध्येच होतो. या भूकंपामध्ये ज्या ज्या व्यक्तींचे नुकसान झालेय, त्या प्रत्येकासाठी मला वाईट वाटतंय. लवकरच सर्व व्यवस्थित होईल. स्टे स्ट्रॉंग जपान..." असं ट्वीट अभिनेत्याने केलंय. न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी ज्यु. एनटीआर, पत्नी लक्ष्मी प्रणती आणि अभय, भार्गव अशा दोन मुलांसोबत तो जपानला गेला होता. (Tollywood)

१ जानेवारीला आलेल्या भूकंपानंतर सुमारे १५५ वेळा जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक भूकंप हे ३ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे होते. मंगळवारी अर्थात आज किमान सहा मोठे हादरे जपानवासीयांना जाणवले आहेत. जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. बचावकार्य सुरु असून पीडितांना मदत केली जात असल्याची माहिती जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी दिली. (Japan)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी जपानमध्ये एकापाठोपाठ एक असे १५५ भूकंप झाले. त्यापैकी दोन भूकंपांची तीव्रता ७.६ आणि ६ रिश्टर स्केल इतकी होती. ७.६ आणि ६ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे जपानच्या पश्चिम किनारपट्टी भागात मोठी हानी झाली. अनेक घरांची पडझड याठिकाणी झाली. भूकंपामुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT