TMKOC Fans Demand Raised To Boycott Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC Serial Trolled: ‘जनता माफ नाही करणार...’ , ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ला बॉयकॉट करण्याची का केली जातेय मागणी?

TMKOC Serial Trolled: सध्या सोशल मीडियावर मालिकेमध्ये दयाबेन येणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Chetan Bodke

TMKOC Fans Demand Raised To Boycott

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मालिकेचं नाव घेताच आपल्याला आपसुकच दयाबेन आणि जेठालालची जोडी डोळ्यासमोर येते. सध्या मालिकेमध्ये दयाबेन नसल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या येण्याची चर्चा होत आहे. नुकतंच सोशल मीडियावर दयाबेनच्या येण्याची चर्चा झाली होती. पण निर्मात्यांनी चाहत्यांची दिशाभूल केल्यामुळे मालिकेला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर दयाबेन येणार असल्याचा एक प्रोमो शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये मालिकेत आता दयाबेन येणार अशी चर्चा होत होती. पण निर्मात्यांनी चाहत्यांची दिशाभूल केल्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)च्या माध्यमातून मालिकेला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. मालिकेतल्या कलाकारांसोबतच चाहतेही दयाबेन येणार म्हणून खूपच उत्साहित झाले होते. पण दिशाभूल झाल्यामुळे सर्वच नाराज झाले.

सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो जोरदार व्हायरल होत आहे. ह्या व्हायरल प्रोमोमध्ये जेठालालचा चेहेरा दु:खी दिसत आहे. गोकुळधाम सोसायटीच्या आवारामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार आलेली दिसत आहे.

सर्वांनाच मालिकेमध्ये आता दयाबेनची एन्ट्री होणार म्हटल्यावर आनंदित होते. पण निर्मात्यांकडून फक्त चाहत्यांचीच नाही तर मालिकेतल्या कलाकारांचीही फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्यामुळे सर्वांच्याच चेहेऱ्यावरून नाराजी दिसत आहे.

‘जनता माफ नाही करणार’ असे अनेक विविध कमेंट करुन नेटकऱ्यांनी मालिकेला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भापुण्यात अटक झालेल्या कार्यकर्त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी

शिवसेना पक्ष-चिन्ह कुणाचा? सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, एकनाथ शिंदे दिल्लीत; धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवर मोठं विधान

मुंबईला जाणारा OBC मोर्चा पुण्यात रोखला; आंदोलनावरून OBC संघटनांमध्ये फूट

युतीची चर्चा फिस्कटली! भाजपचा एकला चलो चा नारा, राजकारणात खळबळ

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT